मुंबई - शिवसेना आणि भाजप यांची युती अभेद्य आहे. आम्ही येणारी विधानसभेची निवडणूक एकत्रच लढणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. निवडणुका जवळ आल्याने प्रसारमाध्यमे भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे सांगत आहेत. मात्र, आम्ही एकत्र लढून पुन्हा युतीचे सरकार आणु असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आमची युती अभेद्य, निवडणूक एकत्रच लढवणार - मुख्यमंत्री - shivendra raje bhosale
शिवसेना आणि भाजपची युती अभेद्य आहे. आम्ही येणारी विधानसभेची निवडणूक एकत्रच लढणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बहुमताचे रेकॉर्ड तोडणार
आता फक्त बहुमताचे कोणते रेकॉर्ड आम्ही तोडणार हे पाहायचे आहे. काही जागांचे निर्णय येत्या पंधरा दिवसात होतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. उद्यापासून (गुरुवार) सुरू होणाऱ्या महाजनादेश यात्रेत संपूर्ण महाराष्ट्र एका विचाराने एकत्र आणु असेही मुख्यमंत्री म्हणाले.
भाजप प्रवेशाच्या वाटेवर असलेल्या राष्ट्रवादीच्या ३ तर काँग्रेसच्या एका आमदाराने आज अखेर हातात कमळ घेतले. कुंपनावर असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. हा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो.