मुंबई -माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपात येतील म्हणून आम्ही मागील पाच वर्षापासून डोळे लावून बसलो होतो. अखेर आज ते आमच्या पक्षात आले. त्याबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करतो, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये स्वागत केले.
हर्षवर्धन पाटील भाजपामध्ये येतील म्हणून मागील पाच वर्षांपासून आम्ही डोळे लावून बसलो होतो - मुख्यमंत्री - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपात येतील म्हणून आम्ही मागील पाच वर्षापासून डोळे लावून बसलो होतो. अखेर आज ते आमच्या पक्षात आले. त्याबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करतो, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये स्वागत केले.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपच्या मुंबई अध्यक्षा मंगल प्रभात लोढा यांच्यासह भाजपचे इतर नेते चर्चगेट जवळील गरवारे क्लब येथे झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हर्षवर्धन पाटील आमच्या पक्षात येत आहेत ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पाटील यांच्यासारखा नेता आल्याने पक्षाला बळकटी मिळेल. त्यांनी संसदीय कामकाज मंत्री म्हणून अत्यंत प्रभावीपणे काम केले आहे. त्याचा पक्षाला लाभ होईल आणि येणाऱ्या काळात राज्यात युतीच निवडून येईल. महायुतीच्या सत्तेत आता इंदापूरच्या जागेचा समावेश झाला असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. येत्या काळात इंदापूर याआपल्या मतदार संघासाठी सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी कालबद्ध पद्धतीने करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.