मुंबई- नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथील खडकी जवळ वाहनाचा अपघात होऊन सहा मजुरांचा मृत्यू झाला. यामध्ये 5 महिलांचाही समावेश आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
नंदुरबारमधील अपघातातील मृतांच्या वारसाला प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत - मुंबई शहर बातमी
नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथील खडकी जवळ वाहनाचा अपघात होऊन सहा मजुरांचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री
अत्यंत दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धडगावमधील हे मजूर होते. अपघातात गंभीर व किरकोळ जखमी झालेल्या मजुरांवरही शासन खर्चाने उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री यांनी पालकमंत्री के.सी. पाडवी आणि जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेत मदत करण्याचा सूचना दिल्या.