मुंबई:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे कार्यकारणीच्या बैठकीसाठी स्वत: हजर झाले आहेत. शिवसेनेवर आलेले संकट दुर करण्यासाठी उध्दव ठाकरे सक्रिय झाले आहेत. काल झालेल्या पक्षांच्या बैठकीला उध्दव ठाकरे व्हिडीओ काॅन्फरंन्सच्या माध्यमातुन सहभाग नोंदवला होता. ते मातोश्रीवर बसुन कारभार पाहतात असा त्यांच्यावर आरोप होत होता. आज बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहुन त्यांनी पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढवला आहे. बंडखोर एकनाथ शिंदे तसेच रामदास कदम यांचे नेते पद काढण्या संदर्भात त्याच बरोबर बंडखोर मंत्र्यांच्या मंत्रीपदा बाबतही या बैठकीत निर्णय होण्याची तसेच सगळ्याच बंडखोरां बाबत निर्णय होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. आज होत असलेल्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते उद्धव ठाकरे सेना भवनात दाखल; निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष - Shiv Sena chief Uddhav Thackeray
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडा नंतर महाराष्ट्रात राजकीय संकट (Maharashtra Political Crisis ) निर्णाण झाले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) कार्यकारणीच्या बैठकीसाठी स्वत: हजर झाले आहेत. काल झालेल्या पक्षांच्या बैठकीला उध्दव ठाकरे व्हिडीओ काॅन्फरंन्सच्या माध्यमातुन सहभाग नोंदवला होता. आज होत असलेल्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे
उद्धव ठाकरे