मुंबई -देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असणाऱ्यामुकेश अंबानी यांच्या महागड्या 'एंटीलिया' या इमारतीत सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीआयएसएफ जवानाचा सर्विस अॅटोमॅटिक बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. देवधन बकोत्रा (वय ३०) असे या जवानाचे नाव असून गावदेवी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा -मनसैनिकांनो 'हे' तुम्हाला टाळावेच लागेल, अन्यथा हकालपट्टी अटळ
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आणि आशियातील श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईत स्थित एंटीलिया या इमारतीच्या सुरक्षेसाठी बुधवारी सीआयएसएफच्या ताफ्यातील देवधन बकोत्रा हा जवान तैनात होता. यावेळी सर्विस अॅटोमॅटिक बंदुकीतून चुकून गोळी सुटून 2 गोळ्या लागल्याने जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - मुंबई महापौर कार्यालय अन् बंगल्यातून प्लास्टिक बॉटल्स हद्दपार, काचेच्या बाटल्या वापरण्याचे निर्देश