मुंबई:मुंबईतील गिरगाव चौपाटीवर ख्रिसमस म्युझिक फेस्टिव्हलचे आयोजन करिता 25 हजार चौरस मीटर जागेवर उत्सव आयोजित करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका संस्थेने उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवर न्यायालयाने Mumbai High Court ठराविक चौरस मीटर परिसरात 15 हजाराहून अधिक समुदायाला सामावून घेता येणार नाही. Girgaon Chowpatty given permission अशावेळी तेथे चेंगराचेंगरीची शक्यता निर्माण होऊ शकते, असे आदेशात नमूद करत उच्च न्यायालयाने ख्रिस्ती समुदायाला 11 डिसेंबर रोजी गिरगाव चौपाटीवर ख्रिसमस म्युझिकल फेस्टिव्हलचे आयोजन करण्यास सशर्त परवानगी दिली आहे.
1965 पासून येशु जन्मोत्सवानिमित्त ख्रिसमस म्युझिक फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी प्रभू येशु जन्मोत्सव सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने येत्या 11 डिसेंबर रोजी गिरगाव चौपाटीवर ख्रिसमस म्युझिकल फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी संस्थेला 4180.3 चौरस मीटरवर फेस्टिव्हल आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली.
खंडपीठासमोर सुनावणी: मात्र फेस्टिव्हलसाठी हजारोंच्या अधिक लोकांचे येणे अपेक्षित आहे. गर्दीच्या तुलनेत मिळालेली जागा अपुरीच्या असल्याचे नमूद करत 25 हजार चौरस मीटर जागेवर उत्सव आयोजित करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका संस्थेने उच्च न्यायालयात केली आहे. त्यावर नुकतीच न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
कार्यक्रम घेण्यास परवानगी: उच्च न्यायालयाने 21 जून 2018 रोजी उच्च न्यायालयानेच संस्थेला 4180.3 चौरस मीटरवर फेस्टिव्हल आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र यंदा उत्सवासाठी 25 हजाराहून अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यात ज्येष्ठ नागरिक लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग अपेक्षा असल्याचे याचिकाकर्त्यांनी सांगितले. तसेच जिल्हाधिकार्यांनी गिरगाव चौपाटीवर 25 हजार चौरस मीटर क्षेत्रामध्ये कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने पर्यावरणवादी आणि तज्ञांचा समावेश असलेली एक समिती गठीत करून उत्सव आयोजित करण्यासाठी अटीशर्ती घातल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
अहवाल सादर: संस्थने या आधीही कार्यक्रम आयोजित करताना विविध अटीशर्तींचा भंग केल्याचे बीएमसीचे वकील अनिल साखरे यांनी न्यायालयाला सांगितले आहे. 15 डिसेंबर 2019 रोजी सुमारे 7500 ते 8 हजार भाविक उपस्थित होते असे सांगणारा डी.एन.मार्ग पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांचा 27 जानेवारी 2020 रोजी सादर केलेल्या अहवाल सादर केला. समितीच्या वकिलांनी याचिकेला विरोध करताना असे सांगितले की 25000 लोकांना चौपाटीवर एकत्र येण्यास परवानगी दिली, तर या याचिकाकर्त्यांमुळे चौपाटीचा मोठा भाग व्यापला जाईल.
ख्रिसमस म्युझिक फेस्टिव्हल आयोजित: मात्र सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर याचिकाकर्त्यांची बाजू न्यायालयाने ग्राह्य धरली. 21 जून 2018 रोजी न्यायालयाने दिलेल्या परवानगीनुसार 4180.3 चौरस मीटरच्या परिसरात सुमारे 25 हजार लोकांना सामावून घेता येणार नाही. आणि त्यामुळे चेंगराचेंगरीची शक्यता निर्माण होईल, असे नमूद करत याचिकाकर्त्या संस्थेला 15 हजार चौरस मीटर जागेवर ख्रिसमस म्युझिक फेस्टिव्हल आयोजित करण्याची परवानगी दिली.
20 जानेवारी 2023 ला सुनावणी: तसेच कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी पुरेशा रक्षकांना तैनात करण्याचे आदेश दिले. याशिवाय व्यावसायिक जाहिराती वापरू नयेत आणि पर्यावरणाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे समितीचे सदस्य, जिल्हाधिकारी, पालिका प्रशासन आणि पोलिसांनी कार्यक्रमाच्या दिवशी घटनास्थळी भेट देऊन छायाचित्रे घ्यावीत, असे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी 20 जानेवारी 2023 रोजी निश्चित केली.