महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भारत-चीन सीमेवर तणाव; दुसरीकडे महाराष्ट्रात चीनची ५ हजार कोटींची गुंतवणूक

सीमेवर भारतासोबत वेगळी भूमिका आणि उद्योग क्षेत्राबाबत वेगळे दृश्य दिसते आहे. सीमेवर भारतासोबत वेगळी वागणूक आणि व्यवहाराचा मुद्दा आला की महाराष्ट्रासोबत मैत्रीपूर्ण गुंतवणूक करार, अशा दोन पातळ्यांवर चीनची वागणूक दिसत आहे.

भारत - चीन सीमेवर तणाव; दुसरीकडे महाराष्ट्रात चीनची ५ हजार कोटींची गुंतवणूक
भारत - चीन सीमेवर तणाव; दुसरीकडे महाराष्ट्रात चीनची ५ हजार कोटींची गुंतवणूक

By

Published : Jun 17, 2020, 9:37 AM IST

मुंबई - भारत-चीनच्या सीमेवरील गलवान येथे सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झटापट झाली. यामध्ये भारताच्या तब्बल २० जवानांना वीरमरण आले. मात्र, याचवेळी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' या उपक्रमातंर्गत महाराष्ट्रात चीनकडून मोठी गुतंवणूक करण्यात आली आहे. सीमेवर भारतासोबत वेगळी भूमिका आणि उद्योग क्षेत्राबाबत वेगळे दृश्य दिसते आहे. सीमेवर भारतासोबत वेगळी वागणूक आणि व्यवहाराचा मुद्दा आला की महाराष्ट्रासोबत मैत्रीपूर्ण गुंतवणूक करार, अशा दोन पातळ्यांवर चीनची वागणूक दिसत आहे.

'मॅग्नेटिक महाराष्ट्र' या उपक्रमातंर्गत विविध 12 देशांतील गुंतवणूकदारांसोबत 16 हजार 30 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. यापैकी एकट्य़ा चीनकडून तब्बल ५ हजार २२० कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात करण्यात आली आहे. चीनमधील ३ महत्त्वाच्या कंपन्यांनी महाराष्ट्रात वेगवेगळ्या उपक्रमातंर्गत ५ हजार २२० कोटी रुपये गुंतवले आहेत.

चीनमधील 'या' कंपन्यांची महाराष्ट्रात गुंतवणूक -

१) हेंगली (चीन) इंजिनिअरिंग - तळेगाव टप्पा क्रमांक -2, पुणे 250 कोटी आणि 150 रोजगार

२) पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन जेव्ही विथ फोटोन ( चीन) ऑटो - तळेगाव 1000 कोटी रोजगार 1500

३) ग्रेट वॉल मोटर्स (चीन) ऑटोमोबाईल तळेगाव - पुणे 3770 कोटी आणि रोजगार 2042

गेल्या काही दिवसांपासून चीन-भारत सीमेवरील वाद हा चर्चेचा विषय राहिला आहे. दोन्ही देशांच्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. एकीकडे सीमेवर भारतासोबत अशाप्रकारची वागणूक तर दुसरीकडे उद्योग किंवा व्यवसायक्षेत्रात मैत्रीपूर्ण संबंध, अशी दुटप्पी भूमिका चीन घेत आहे. सध्या भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांमधील प्रस्तावित करार कशाप्रकारे पूर्ण होतात, याकडे उद्योगविश्वाचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details