मुंबई -विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत सर्वच पक्षांचे जाहीरनामे तयार झालेले आहेत. त्यामध्ये अनेक मुद्दे प्रत्येक पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात मांडलेले आहेत. परंतु लहान बालकांकडे म्हणजेच 18 वर्षाखालील बालकांच्या काय मागण्या याकडे कोणाचे लक्ष जात नाही. त्यामुळे मुंबईतील लहान मुलांनी मुंबईत विविध भागात फिरत त्यांचे काय प्रश्न आहेत याचा आढावा घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी देखील आपला जाहीरनामा जनतेसमोर तसेच पक्षांसमोर मांडला आहे.
युवा संस्था आणि बाल अधिकार संघर्ष संघटना यांनी संयुक्तपणे मुलांच्या घोषणापत्राबाबत काही दिवसांपूर्वी चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात सामाजिक संस्था आणि बाल प्रतिनिधी उपस्थित होते. या चर्चासत्रात बाल प्रतिनिधींनी वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा, गटकार्य करून आणि मुलांच्या संदर्भात असलेल्या प्रश्नांवर विचार विमर्श करून स्वतःचे घोषणापत्र तयार केले आहे. ज्या मुलांच्या संदर्भात राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी आणि शासनाकडून काय अपेक्षा आहेत मुलांना काय वाटते, हे या घोषणापत्रात नमूद केलेले आहे. सदर घोषणापत्र हे मुलांनी क्रियाशील सहभाग घेऊन मते मांडून एकमेकांशी चर्चा करून बनवलेले आहे. हे जे घोषणापत्र बनवल्यानंतर युवा सीसीडीटी, मुंबई इस्माईल ,प्रथम जीवंधरा, लाईफ ऑफ लाइफ प्रश्न या सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी यावर अभ्यास केला. नंतर हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.