महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाजनादेश यात्रेनंतर मुख्यमंत्र्यांची 'मुंबई चाले भाजपासोबत' प्रचाराला सुरुवात - rahul narvekar at mumbai chale bjp sobat

अभियाना अंतर्गत आज सकाळी ७.०० वा. हॉटेल ट्रायडेंट, मरीन ड्राईव्ह, नरीमन पोइंट, येथे "आओ चले मुख्यमंत्रीजी के साथ' हा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपा अध्यक्ष तसेच मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अ‍ॅड. मंगलप्रभात लोढा व कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहूल नार्वेकर सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Oct 13, 2019, 9:29 AM IST

मुंबई- विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. त्या पार्श्वभूमिवर सर्वत्र प्रचाराची धामधूम सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपल्या परीने सर्वत्र प्रचार करत आहे. प्रामुख्याने मुंबईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण मुंबईमध्ये ३६ मतदारसंघ आहेत. हे ३६ मतदारसंघ भाजपला राखता यावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेनंतर आता भाजपकडून 'मुंबई चले भाजपासोबत' हे अभियान राबवण्यात येत आहे.

या अभियाना अंतर्गत आज सकाळी ७.०० वा. हॉटेल ट्रायडेंट, मरीन ड्राईव्ह, नरीमन पोइंट, येथे "आओ चले मुख्यमंत्रीजी के साथ' हा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपा अध्यक्ष तसेच मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अ‍ॅड. मंगलप्रभात लोढा व कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहूल नार्वेकर सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आज भाजपची प्रचाराला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा-मुंबईच्या ग्रँट रोड परिसरातील आदित्य आर्केड इमारतीला भीषण आग

मुंबईत सर्वत्र हे अभियान चालणार आहे. मुंबईच्या इतर भागांमध्ये खालील नेते 'मुंबई चाले भाजपसोबत' मध्ये सहभागी होतील:

-खा. गोपाळ शेट्टी - पोईसर जिमखाना
-खा. पूनम महाजन - पेस्तम सागर रोड नं. ४
-खा. मनोज कोटक - रुनवाल एनफोरीयम गार्डन, मुलुंड (प)
- सुनील राणे - बोरीवली - पोईसर जिमखाना
-आ. मनीषा चौधरी - दहिसर - चंदावरकर लेन, बोरीवली (प)
-आ. अतुल भातखळकर - कांदिवली (पू) - विलासराव देशमुख उद्यान, लोखंडवाला
- राज्यमंत्री योगेश सागर - चारकोप - माखिजा गार्डन - मथुरादास रोड
- रमेश सिंह ठाकूर - मालाड (प) - लिबर्टी गार्डन, एव्हरशाईन नगर, मालाड (प)
- राज्यमंत्री विद्या ठाकूर - गोरेगाव - जयप्रकाश गार्डन
- आ. भारती लव्हेकर - वर्सोवा - चित्रकुट मैदान, लिंक रोड, आरटीओ ऑफिस जवळ
- आ. अमित साटम - अंधेरी (प) - अंधेरी स्टेशन (प)
- मिहीर कोटेचा - मुलुंड - सरदार प्रताप सिंह गार्डन योगी हिल
- आ. राम कदम - घाटकोपर (प) - श्रेयस गार्डन, घाटकोपर (प)
- पराग शाह - घाटकोपर (पू) सोमैय्या कॉलेज पटांगण, विद्याविहार (पू)
- अ‍ॅड. पराग अळवणी - विले पार्ले - प्रबोधन ठाकरे उद्यान, विलेपार्ले (पू)
- अ‍ॅड. आशिष शेलार - बांद्रा (प) - बांद्रा रेक्लेमेशन प्रोमेनेड, बांद्रा (प)
- कॅप्टन तमिल सेल्वन - सायन कोळीवाडा - सायन जैन देरासार, जैन सोसायटी
- कालिदास कोळंबकर - वडाळा - ५ गार्डन, दादर

ABOUT THE AUTHOR

...view details