मुंबईChhagan Bhujbal Reaction : ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) आव्हान देणारी याचिका बाळासाहेब सराटे यांच्या वतीनं मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दाखल झाली होती. त्याबाबत आज मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी अपेक्षित आहे. परंतु न्यायालयात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी तांत्रिक काम म्हणून केवळ सही करण्यासाठी आले असता, माध्यमांनी त्यांना गरडा घातला. त्यावेळेला त्यांनी म्हटलं की,आंदोलन करून काहीजण ओबीसीच्या आरक्षणात घुसखोरी करत आहेत. आता न्यायालयात देखील आरक्षणाला धक्का लावला जात आहे.
ओबीसी तरी खपवून घेतील का: छगन भुजबळ यांनी म्हटलं की, 2018 साली याचिका दाखल झाली होती. ओबीसी आरक्षण संदर्भात पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावं अशी मागणी आहे. म्हणजे सर्व कायदेशीर प्रक्रिया केल्या गेल्या आणि त्याला पुन्हा आव्हान दिलं जात आहे. मी हायकोर्टात आलो होतो एका तांत्रिक कामासाठी. मात्र कॅबिनेट बैठक असल्यामुळं परत निघालो. कुणबी सर्टिफिकेट घ्यायचं आणि ओबीसींमध्ये यायचं. त्यामुळं जे ओबीसी आहेत ते बाहेर फेकले जाणार आहेत. हे ओबीसी प्रवर्ग खपवून घेणार नाही.
ओबीसींच्या हक्कासाठी याचिकांवर लक्ष ठेवून आहोत : ओबीसी आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये किंवा कोणत्याही न्यायालयामध्ये याचिका दाखल होतात. परंतु या सर्व याचिकांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. छोट्या राज्यातील कोट्यवधी ओबीसी प्रवर्गातील शेकडो जातींच्या विकासाचा मुद्दा आहे.