मुंबई:मंत्री छगन भुजबळ म्हणाले, ओबीसीमध्ये असलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या, ओबीसीतून नको. रोज दोन-चार हजार पुरावे जास्त आढळत आहेत. 2 दिवसांत नोंदीचा आकडा कसा वाढला? आरक्षण फार मोठ्या प्रयासानं मिळाले आहे. ओबीसी आरक्षण संपविण्याचा घाट घातला जात आहे. ओबीसीत मराठे आले तर कुणालाच आरक्षण मिळणार नाही. ओबीसी आरक्षण वाचविणं, हा माझ्यासमोर प्रश्न आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण राज्यभर रान पेटविल्यानंतर राज्य सरकारनं महत्त्वाची पावले उचलली आहेत. मात्र, मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यास अजित पवारचे गटाचे नेते छगन भुजबळ यांनी विरोध दर्शविला आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ असा वाद पाहायला मिळाला. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची मंगळवारी बैठक पार पडली. ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला घुसवायचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी बुधवारी केला.
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यावर विरोध -मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दुसऱ्यांदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचं हत्यार उपसले होते. त्यानंतर निवृत्ती न्यायाधीशांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन आरक्षणात येत असलेल्या अडचणीची माहिती दिली होती. त्यानंतर राज्यभर मराठा समाजाच्या कागदपत्रांची तपासणी करत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यावर विरोध दर्शवला. मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी झालेल्या ओबीसी नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला प्रकाश अण्णा शेंडगे, लक्ष्मण गायकवाड, जे, पी, तांडेल यांच्यासोबत राज्यातील ओबीसी नेते उपस्थित होते.
आमच्या समाजात सरकारला खाली खेचण्याची ताकद असल्याचे यावेळी ते म्हणाले. ओबीसी समाज सरकारला मतपेटीतून आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शेंडगे यांनी सरकारला दिला आहे. ओबीसी खतरे मे है, जो ओबीसी हित की बात करेगा वो देश पे राज करेगा.ओबीसी नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे.
छगन भुजबळ यांना टार्गेट का केलं जाते-ओबीसी नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे म्हणाले, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधील 345 जातींवर अन्याय केला जात आहे. त्यांचे हा आरक्षण हडप करण्याचं काम सुरू आहे. असा प्रकार ओबीसी नेते मुळीच खपवून घेणार नाही. यासाठी मंत्रिमंडळात राहून ओबीसीसाठी संघर्ष करावा, अशी आम्ही मंत्री छगन भुजबळ यांना विनंती केली आहे. आम्ही बाहेर संघर्ष करू आपण कोणत्याही प्रकारे राजीनामे देऊन मंत्रिमंडळातुन बाहेर पडायचं नाही, अशा प्रकारची विनंती आम्ही मंत्री छगन भुजबळ यांना केली. मात्र छगन भुजबळ यांना टार्गेट का केलं जाते? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
आता रस्त्यावरची लढायला सुरुवात करणार-ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. मराठा समाजाला कुणबी दाखल्यात दिल्यामुळे ओबीसी समाजाचे मोठ्या प्रमुख नुकसान होत आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाला ओबीसी आरक्षण घुसवण्याचा प्रयत्न केला जात असून हे षडयंत्र आम्ही हाणून पाडू. सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणं महाराष्ट्रातील मराठा समाज मागासलेला नाही, हे सिद्ध झालं. आजच्या बैठकीत कुणबी दाखले देण्याच्या विरोधात आम्ही न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे समितीतही मराठा समाज आहे. दिवाळीनंतर आम्ही आंदोलन करणार आहोत. 17 नोव्हेंबर रोजी अंबड येथे पहिला ओबीसी मेळावा होणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. त्यानंतर संपूर्ण राज्यभर अशाच प्रकारचे मेळावे घेतले जाणार आहेत.
हेही वाचा-
- Maratha Reservation : 'फडणवीसांना मुख्यमंत्री होऊ न देण्याच्या नादात उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाचा घात केला'
- Maratha Reservation Suicide : मराठा आरक्षणासाठी तब्बल 'इतक्या' आत्महत्या; मराठवड्यात प्रमाण जास्त
- Maratha Reservation : मराठा आरक्षण, कुणबी नोंदीच्या मुद्द्यावर सोमवारी मंत्रालयात महत्त्वाची बैठक