मेष - वेळेचा सदुपयोग करा. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा नवीन कार्य सुरू करण्यासाठी हा एक योग्य दिवस आहे. आज तुम्ही गरजूंसाठी हात पुढे कराल. स्वत:च्या मतांवर ठाम राहा.
वृषभ - आजचा दिवस अस्वस्थ करणारा असेल. तुमच्याशी वाईट वागणाऱ्यांशी भांडण करू नका. त्याने संबंध खराब होण्याची शक्यता आहे. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे. इतरांना कर्ज देणे टाळा.
मिथुन -आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीशील आहे. एखाद्या गोष्टीचा आनंद घेताना मर्यादेचे भान ठेवा. तडजोड करणे फायद्याचे ठरेल. जेव्हा तुम्ही त्याग करणे शिकाल. त्यानंतर सर्वकाही ठिक होईल. आज प्रलंबित कामांवर लक्ष केंद्रीत करा. ही कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस आहे. इतरांशी समन्वय साधताना आपल्याला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
कर्क - आजचा दिवस समाधानकारक असेल. आज आपण गुंतागुंतीच्या परिस्थितीतून जाऊ शकता. आजचा दिवस गुंतवणुकीसाठी चांगला आहे. मात्र, जमीन आणि वाहन क्षेत्रात गुंतवणूक टाळा. एकापेक्षा अधिक काम केल्याने थकवा जाणवू शकतो. परंतु त्यामुळे काहीतरी साध्य केल्याची भावना येईल.
सिंह - कुटुंबातील सदस्यांकडे विशेष लक्ष द्याल. त्यांना त्यांचे वेळापत्रक सुधारण्यासाठी मार्गदर्शन कराल. आरोग्याच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. सकारात्मक राहा. अधिक पैसे कमावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा.
कन्या - आज हाती घेतलेल्या कामामध्ये चमत्कारिक कामगिरी करण्याची शक्यता आहे. आज आपल्या प्रिय व्यक्तीचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करू शकता. जास्तीत जास्त पैसे कमविण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरेल. त्यामुळे तुम्ही निराश होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस समाधानकारक असेल.