महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

17 दिवसांपासून सरकार झोपलेले का? पीएमसीवरुन चरणसिंगांचा हल्लाबोल - पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँके

पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँकेत झालेल्या घोटाळ्याबाबत सरकार गंभीर नाही. ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत आणि सरकार झोपलेले आहे. त्यांना सामान्यांच्या प्रश्नांशी काही देणंघेणं नाही, असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते चरणसिंग सप्रा यांनी केला.

चरणसिंह सप्रा

By

Published : Oct 10, 2019, 7:08 PM IST

Updated : Oct 10, 2019, 7:25 PM IST

मुंबई - पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँकेत झालेल्या घोटाळ्याबाबत सरकार गंभीर नाही. ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत आणि सरकार झोपलेले आहे. त्यांना सामान्यांच्या प्रश्नांशी काही देणंघेणं नाही, असा हल्लाबोल काँग्रेस नेते चरणसिंग सप्रा यांनी केला.

बोलताना चरणसिंग सप्रा


बँकेवर निर्बंध लावून 17 दिवस झाले. मात्र, अजूनही कोणता निर्णय घेण्यात आला नाही. या प्रकरणी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेतली. परंतु, ही परिषद निराशाजनक होती, अशी टीका सप्रा यांनी केली. कोणातही ठोस निर्णय यावेळी सांगण्यात आला नाही. आज बँकेवर निर्बंध लावून 17 दिवस झाले आहेत.

हेही वाचा - मुंबईत निवडणूक कर्मचारी, ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे रॅण्डमायझेशन

या परिषदेत बँकेतील 16 लाख ठेवीधारांच्या ठेवीबाबत कोणतेही भाष्य करण्यात आले नाही. ठेवीधारांचे पैसे सुरक्षित आहेत की नाहीत, बँकेला काही पॅकेज देण्यात येणार आहे की नाही, याबाबत काही सांगण्यात आले नाही. या प्रकरणातून सरकार स्वतःचे अंग काढून घेत आहे, असा आरोप सप्रा यांनी केला.


जर हे सरकार 2 दिवसांत आरेतील झाडे तोडू शकते, तर 17 दिवसांत पीएमसी बँकेबाबत निर्णय का घेऊ शकत नाही, असा प्रश्नही सप्रा यांनी उपस्थित केला. आरबीआय गव्हर्नरची याबाबत भेट घेणार, असे सीतारामण म्हणतात. समिती स्थापन करण्यात येईल. पण 17 दिवस सरकार झोपलेले का, असा सवाल सप्रा यांनी केला.

हेही वाचा - राहुल गांधीची देशाच्या राजकारणातील किमया संपली आहे - रामदास आठवले

Last Updated : Oct 10, 2019, 7:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details