मुंबई -निसर्ग चक्रीवादळामुळे आज मुंबईहून सुटणाऱ्या विशेष लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. तसेच मुंबईत येणाऱ्या गाड्यांच्या मार्गातही बदल करण्यात आला असून या गाड्या नियोजित वेळेपेक्षा मुंबईत उशिराने दाखल होतील. मध्ये रेल्वेकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईहून सुटणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल - निसर्ग चक्रीवादळ न्यूज
निसर्ग चक्रीवादळामुळे आज मुंबईहून सुटणाऱ्या विशेष लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. चक्रीवादळाचा वेग क्षणाक्षणाला वाढत असल्यामुळे रेल्वेकडून ही खबरदारी घेण्यात येत आहे.
मुंबई
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निसर्ग चक्रीवादळ मुंबईत येत आहे. या वादळादरम्यान मोठा पाऊस पडून पाणी साचल्यास किंवा एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी मुंबई अग्निशमन दल सज्ज आहे. चक्रीवादळाचा वेग क्षणाक्षणाला वाढत असल्यामुळे रेल्वेकडून ही खबरदारी घेण्यात येत आहे.