महाराष्ट्र

maharashtra

निसर्ग चक्रीवादळामुळे लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गात बदल

By

Published : Jun 3, 2020, 12:20 PM IST

निसर्ग चक्रीवादळामुळे विशेष लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत आणि मार्गात बदल करण्यात आला आहे. मार्गात बदल केल्याने या गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने दाखल होतील.

मुंबई
मुंबई

मुंबई -निसर्ग चक्रीवादळामुळे विशेष लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत आणि मार्गात बदल करण्यात आला आहे. मुंबईत येणाऱ्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. मार्गात बदल केल्याने या गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने दाखल होतील.

एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन विशेष गाडी (02617) मडगाव-पनवेल-कल्याण-इगतपुरी-नाशिक रोड या मार्गाऐवजी मडगाव-लोंडा-मिरज-पुणे-दौंड-चोर्ड लाइनमार्गे रवाना होईल. 2 जूनला निघालेली तिरुवंथपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल गाडी (06346) मडगाव-पनवेल ऐवजी मडगाव-मिरज-पुणे-कल्याणमार्गे मुंबईत दाखल होईल

2 जून रोजी निघालेली नवी दिल्ली तिरुवंथपुरम विशेष गाडी (02432) सुरत-वसई रोड-मडगाव ऐवजी सुरत-वसई रोड-कल्याण-पुणे-मिरज-लोंडा- मडगाव मार्गे रवाना होईल. हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम विशेष गाडी ( 02618 ) नाशिक रोड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-मडगाव ऐवजी मनमाड-दौंड-चोर्ड-लाईन-पुणे-मिरज-लोंडा-मडगाव मार्गे धावेल. 2 जून रोजी प्रवास सुरु झालेली तिरुवंनतपुरम-नवी दिल्ली विशेष गाडी (02431) मडगावला थांबवण्यात येईल आणि आवश्यकता असल्यास कोकण रेल्वेच्या मार्गात बदल करेल.

आठवड्यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ धडकल्यानंतर देश नव्या चक्रीवादळाला सामोरे जात आहे. हे निसर्ग नावाचे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. निसर्ग हे चक्रीवादळाचे नाव भारताचा शेजारी असलेल्या बांगलादेशने दिलेले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details