मुंबई - मान्सून दाखल होण्याच्या आणि परतीच्या पावसाच्या सर्वसाधारण वेळापत्रकात बदल झाल्याची माहिती स्कायमेटने ट्विटरद्वारे दिली आहे. यापूर्वी 10 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता होती. मात्र, आज तारखेत बदल झाला आहे. त्यानुसार मुंबईत 11 जून रोजी, तर दिल्लीत 27 जून रोजी मान्सूनचे आगमन होणार आहे.
मान्सून दाखल होण्याच्या वेळापत्रकात बदल - monsoon latest news
मान्सून दाखल होण्याच्या आणि परतीच्या पावसाच्या सर्वसाधारण वेळापत्रकात बदल झाल्याची माहिती स्कायमेटने ट्विटरद्वारे दिली आहे. यापूर्वी 10 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता होती. मात्र, आज तारखेत बदल झाला असून मुंबईत मान्सून 11 जूनला येणार आहे.
मान्सून परतण्याची तारीख 29 सप्टेंबरच्या जागी 8 ऑक्टोबर असणार आहे. तसेच लॉकडाउनमुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील उन्हाळ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी पुढील दिवस दिलासादायक ठरणार आहे. पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गेल्या आठवड्यातही राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण विभागातही पावसाने हजेरी लावली होती.