महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

..त्यामुळे वेतन करारासाठी ठराविक तारीख देणे अशक्य - अनिल पाटणकर

बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. वेतन करार झाला नाही, तर कामगार संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे. बेस्ट कर्मचारी कालपासून वडाळा डेपोबाहेर धरणे आंदोलन करत आहेत.चर्चेमधून मार्ग निघेल त्यामुळे कामगारांनी संप करू नये, असे आवाहन बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी केले आहे.

बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर

By

Published : Aug 27, 2019, 6:38 PM IST

मुंबई -बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. वेतन करार झाला नाही, तर कामगार संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे. मात्र सध्या सर्वच संघटनांसोबत चर्चा सुरु आहे. चर्चेमधून मार्ग निघेल त्यामुळे कामगारांनी संप करू नये, असे आवाहन बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी केले आहे.

बेस्ट कामगारांना आवाहन करताना समिती अध्यक्ष अनिल पाटणकर
संघटनांसोबत चर्चा सुरु असल्याने वेतन कराराची एखादी ठराविक तारीख बेस्ट प्रशासन सांगू शकत नाही, असेही पाटणकर म्हणाले. वेतन करार, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, बोनस या मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी कालपासून वडाळा डेपोबाहेर धरणे आंदोलन करत आहेत.दरम्यान, आज बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटना यांच्यामध्ये वेतन करार होईल, असे शिवसेनेच्या कामगार संघटनेने सांगितले होते. त्याप्रमाणे अद्याप कोणताही करार झालेला नाही. त्यामुळे कामगार संघटना आणि कृती समिती संपाची हाक देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पालिकेने सुचवल्याप्रमाणे आम्ही सुधारणा केल्या आहेत. यामुळे पालिकेने ११३६ कोटी आणि ६०० कोटी रुपये दिले असल्याचे पाटणकर यांनी सांगितले.बेस्टने आपले तिकीट दर ५ रुपये केले आहेत, याकारणाने बेस्टच्या प्रवाशांच्या संख्येत १० लाख प्रवाशांची वाढ झाली आहे. येत्या काही दिवसात मुंबईमधील सर्वात मोठा सण असलेला गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. कामगार संघटना आणि कृती समितीचे पत्र कालच मला मिळाले आहे. बेस्ट महाव्यवस्थापकांना याबाबत चर्चा करण्यास सांगितले आहे. महाव्यवस्थापक आंदोलनकर्त्या संघटनांबरोबर चर्चा करतील. वाढलेले प्रवासी, येणाऱ्या एसी बसेस आणि गणेशोत्सव लाक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी संप करू नये, असे पाटणकर म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details