महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केंद्रीय सुरक्षा बलाच्या आणखी 6 जवांनाची टेस्ट पॉझिटिव्ह, एकुण 11 जणांना लागण

केंद्रीय सुरक्षा बलाच्या खारघर येथील मुख्यालयात नियुक्त असणाऱ्या 146 कर्मचाऱ्यांपैकी 11 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

कार्यालय
कार्यालय

By

Published : Apr 3, 2020, 7:33 PM IST

Updated : Apr 3, 2020, 8:14 PM IST

मुंबई- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णांच्या संख्येत भर पडत असताना आणखीन एक चिंताजनक घटना समोर आली आहे. केंद्रीय सुरक्षा बलाच्या खारघर येथील मुख्यालयात नियुक्त असणाऱ्या 12 कर्मचाऱ्यांपैकी 5 जवानांची कोरोना चाचणी यापूर्वी पॉझिटिव्ह आढळून आली होती. आता आणखी 6 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

त्यानुसार कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी तातडीने आदेश काढून 2 एप्रिल रोजी रात्री उशिरा 146 अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्याची आदेश जारी केले होते. यानंतर तात्काळ संबंधित जवानांची कोविड-19 टेस्ट घेण्यात आली. यापैकी 6 चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांना तात्काळ विलगीकरणात ठेवल्यामुळे संभाव्य धोका कमी झाला आहे. एमजीएम रूग्णालयात त्यांच्यासाठी स्वतंत्र 2 विंग तयार करण्यात आले असून त्यांना आवश्यक असणा-या सर्व सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

हेही वाचा -'टाळ्या झाल्या, आता मेणबत्या लावा, पण रोजगार किती गेले सांगणार आहात का?'

Last Updated : Apr 3, 2020, 8:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details