मुंबई Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din : राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर 2023 रोजी आहे. देशभरातून लाखो प्रवासी मुंबई या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात. त्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून 14 सामान्य विशेष ट्रेन चालवण्याचा (Central Railway Special Trains) निर्णय घेण्यात आलाय.
मध्य रेल्वेकडून 14 विशेष जनरल ट्रेन :डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोकं मुंबईला चैत्यभूमी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतात. याचे औचित्य साधून मध्य रेल्वेकडून 14 विशेष जनरल ट्रेन चालवल्या जाणार आहेत. त्याबाबतचे वेळापत्रक देखील मध्य रेल्वेनं घोषित केलंय. प्रवाशांनी त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.
छत्रपती शिवाजी टर्मिनस ते सेवाग्राम तसेच छत्रपती शिवाजी टर्मिनस ते अजनी तसेच छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कलबुर्गी या रेल्वे स्थानकांपर्यंत विशेष सामान्य ट्रेन चालवल्या जाणार आहेत. तसेच सोलापूर, नागपूर येथे देखील या विशेष ट्रेन धावणार आहेत.
- ट्रेन क्रमांक 1262 : नागपूर येथून चार डिसेंबर रोजी मुंबईकडं निघणार आहे. 11:55 मिनिटांनी नागपूर येथून ही गाडी सुटणार आहे आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी तीन वाजून 30 मिनिटांनी पोहोचणार आहे.
- ट्रेन क्रमांक 1264 : पाच डिसेंबर रोजी नागपूर येथून सकाळी आठ वाजता ही गाडी सुटेल आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे त्याच दिवशी रात्री अकरा वाजून 45 मिनिटांनी पोहोचेल.
- ट्रेन क्रमांक 1266 : पाच डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथून तीन वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी सुटेल तर मुंबईला दहा वाजून 55 मिनिटांनी दुसऱ्या दिवशी पोहोचेल.
परतीसाठीही ट्रेनची सोय :तसेच मुंबई दादर ते सेवाग्राम एक्सप्रेस देखील सहा डिसेंबरपासून प्रवाशांना घराकडे जाण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. सहा डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वाचार वाजता मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता पोहोचेल, तर दुसरी ट्रेन संध्याकाळी सहा वाजून 35 मिनिटांनी मुंबई येथून सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता पोहोचेल. तर तिसरी ट्रेन 7 डिसेंबर रोजी दादर रेल्वे स्थानकातून रात्री बारा वाजून 40 मिनिटांनी सुटेल तर दुसऱ्या दिवशी तीन वाजून 55 मिनिटांनी सेवाग्रामला पोहोचले. या रीतीने 8 डिसेंबरपर्यंत विशेष ट्रेन चालवल्या जातील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी दिली आहे.
हेही वाचा -रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; मुंबई-पुण्यादरम्यान धावणाऱ्या मेल एक्सप्रेस ट्रेन तात्पुरत्या रद्द