मुंबई -भारतीय रेल्वेवर नव्या संकल्पनांची अंमलबजावणी करण्यास सुरूवात झाली आहे. कारण ऊर्जेच्या गरजेसाठी स्वावलंबी होण्याचा रेल्वे प्रयत्न करीत आहे. रेल्वेने 2030 पर्यंत 'शून्य' कार्बन उत्सर्जनाचे मोठ्या प्रमाणातील परिवहन नेटवर्क साध्य करण्यासाठी निर्णायक पावले उचलली आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून, मध्य रेल्वेच्या समन्वयामुळे मेसर्स महिंद्रा अँड महिंद्रासारख्या ऑटोमोबाईल कंपन्यांनी भारतातील काही भागात पाठवण्यासाठी कार रेल्वेने पाठविणे सुरू केले आहे. त्याद्वारे मौल्यवान इंधनाची बचत होते आणि कार्बन फूटप्रिंट मिळविता येते.
मध्य रेल्वेने सुरू केली महिंद्रा अँड महिंद्राच्या गाड्यांची वाहतूक
भारतीय रेल्वेवर नव्या संकल्पनांची अंमलबजावणी करण्यास सुरूवात झाली आहे. कारण ऊर्जेच्या गरजेसाठी स्वावलंबी होण्याचा रेल्वे प्रयत्न करत आहे. रेल्वेने 2030 पर्यंत 'शून्य' कार्बन उत्सर्जनाचे मोठ्या प्रमाणातील परिवहन नेटवर्क साध्य करण्यासाठी निर्णायक पावले उचलली आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून, मध्य रेल्वेच्या समन्वयामुळे मेसर्स महिंद्रा अँड महिंद्रासारख्या ऑटोमोबाईल कंपन्यांनी भारतातील काही भागात पाठवण्यासाठी कार रेल्वेने पाठविणे सुरू केले आहे.
वस्तू, पार्सल क्षेत्रातील रेल्वेचा वाटा वाढविण्यासाठी तयार केलेल्या 'व्यवसाय विकास युनिट्स' ने उद्योग आणि क्षेत्रनिहाय दोन्ही आवक आणि जावक साहित्याचा डेटा संकलित केला आहे. मेसर्स महिंद्रा आणि महिंद्रा यांच्याशी समोरासमोर झालेल्या एकत्रित बैठकीमुळे वाहने जास्त प्रमाणात लोड झाली. त्यांची वाहने पोहोचविण्यासाठी प्रथमपासून शेवटपर्यंत कनेक्टिव्हिटी देखील आहे. या माध्यमामुळे आपल्या प्लांटमध्ये तयार झालेल्या नवीन वाहनांना देशातील विविध शहरांमधील डिलर्सकडे नेण्यासाठी लागणारा वेळ कमी होतो.
विशिष्ट रॅकमधून वाहने पाठवली जातात. अशा एका रॅकमध्ये 118 वाहने नेऊ शकतात. तर नवीन उच्च क्षमता असलेली बीसीएसीबीएम रेल्वे वाघिणीची रॅक अंदाजे 300 वाहने वाहून नेऊ शकते. सध्या, रेल्वे ऑटोमोबाईल वाहतुकीसाठी न्यू मॉडिफाइड गुड्स (एनएमजी) रॅक आणि खासगी मालकीचे बीसीएसीबीएम रॅकचा वापर करते. वाहतुकीची वेळ कमी करण्यासाठी या रॅक्सच्या वाहतुकीवर बारीक नजर ठेवली जात आहे आणि त्यानंतर पुढील लोडिंगसाठी हे रॅक्स उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांचे समाधान होत आहे. महाराष्ट्र हे एक मोठे ऑटोमोबाईल वाहन केंद्र आहे. जिथे महिंद्र, टाटा, फोर्ड, पियाजिओ, बजाज इत्यादी कंपन्या मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद भागात वाहने तयार करतात. महाराष्ट्रात उत्पादित वाहने (ऑटोमोबाईल) देशाच्या विविध भागात नेण्याची बरीच क्षमता आहे.
मेसर्स टाटा मोटर्स व इतर वाहन कंपन्यांसमवेत 'व्यवसाय विकास युनिट्स'च्या बैठका घेतल्या गेल्या आहेत. वाहतुकीसाठी स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. मेसर्स मारुतीनेही या आर्थिक वर्षात फ्रेट ट्रेनचा वापर करून देशभरातून 1.78 लाख मोटारींची वाहतूक 6 लोडिंग टर्मिनल्सवरून नागपूर व मुंबईसह 13 टर्मिनलवर केली आहे.
जुलै 2020 मध्ये मध्य रेल्वेने 18 रॅकद्वारे मोटारींची वाहतूक कमी खर्चाने केली आहे. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेने दौंडहून प्रथमच मोलॅसेस अल्कोहोल कचर्यापासून निर्मित अॅग्रो बेस्ड खताची (पोटाश) वाहतूक केली आहे. नागपूर विभागातील बैतूल व मुलताई स्थानकांवरून नव्याने गव्हाची वाहतूक, खंडवा व पारस येथून मका; भुसावळ विभागातील चाळीसगाव येथून भुसा वाहतूक सुरू झाला आहे. मध्य रेल्वेचे इतर लक्ष्य हे वस्तू फ्लाय अॅश, कापूस इत्यादी आहेत. बांगलादेशला निर्यातीसह कांदा लोडिंगमध्येही बरीच वाढ झाली आहे. कार्बन फूटप्रिंट वाचविण्यात सहभागी होण्यासाठी ग्राहकांनी मध्य रेल्वेशी हातमिळवणी करण्याचे रेल्वेने आवाहन केले आहे.