महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मध्य रेल्वेचा 2 पार्सल गाड्यांची सेवा 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्याचा निर्णय - पार्सल गाड्यांची सेवा वाढवली

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -शालीमार पार्सल विशेष ट्रेन आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -चेन्नई सेंट्रल पार्सल विशेष ट्रेन या पार्सल गाड्यांची सेवा 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

mumbai to chennai railway
मुंबई ते चेन्नई रेल्वे

By

Published : Jul 4, 2020, 2:17 PM IST

मुंबई -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) - शालिमार एक्सप्रेस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) -चेन्नई सेंट्रल पार्सल विशेष गाड्या 31 डिसेंबर पर्यंत चालवण्यात येणार आहेत. ही माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

औषधे आणि नाशवंत वस्तू इत्यादी पाठविण्यासाठी रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -शालिमार पार्सल विशेष ट्रेन आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -चेन्नई सेंट्रल पार्सल विशेष ट्रेन या पार्सल गाड्यांची सेवा 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

पार्सल गाड्यांचा तपशील

१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -शालिमार पार्सल विशेष ट्रेन

00113 पार्सल विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून 31 डिसेंबर पर्यंत दररोज 11 वाजून 55 मिनिटांनी सुटेल आणि तिसर्‍या दिवशी 11.35 वाजता शालीमार येथे पोहोचेल.

00114 पार्सल विशेष गाडी 31 डिसेंबर पर्यंत दररोज रात्री 9.45 वाजता शालीमार येथून सुटेल आणि तिसर्‍या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे 9.25 वाजता पोहोचेल.

पार्सल गाडीचे थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बडनेरा, अकोला, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर, खडगपूर, पाॅशकुडा, मेचेदा.

२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -चेन्नई सेंट्रल पार्सल विशेष ट्रेन

00115 पार्सल विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 31 डिसेंबर पर्यंत दर सोमवार आणि शुक्रवार 7.35 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 11.25 वाजता चेन्नई सेंट्रल येथे पोहोचेल.

00116 पार्सल विशेष गाडी चेन्नई सेंट्रल येथून 31 डिसेंबर पर्यंत दर बुधवार आणि रविवारी दुपारी 12.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसर्‍या दिवशी 4.20 वाजता पोहोचेल.

पार्सल गाडीचे थांबे: कल्याण, लोणावळा, पुणे, सोलापूर, वाडी, सिकंदराबाद, विजयवाडा आणि गुडूर.

ABOUT THE AUTHOR

...view details