मुंबई - लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना महायुतीला भरघोस यश देण्यामध्ये रिपाइंचा महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एका मंत्रिपदाची मागणी तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत 10 जागा आणि रिक्त महामंडळांवरील नियुक्त्या, अशा सर्व मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंला एका मंत्रिपदाची लॉटरी; आठवलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आज केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी वर्षा निवासस्थानी अर्धा तास चर्चा केली.यामध्ये रिपाईच्या वतीने मागणी केलेल्या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याची माहिती आठवले यांनी पत्रकारपरिषेत दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी रामदास आठवले यांनी आज वर्षा निवासस्थानी अर्धा तास चर्चा केली. यामध्ये रिपाइंच्या वतीने केलेल्या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याची माहिती बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी दिली. तसेच मुंबईतील राजग्रह येथील डॉक्टर आंबेडकरांचे घर राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करावे. त्यासाठी सध्या तिथे राहत असलेले प्रकाश आंबेडकर यांचे कुटुंबीय आणि भाडेकरू त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात यावे, अशीही मागणी आठवले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुंबईतील इंदू मिलमधील प्रस्थापित डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाबाबत चौथरा सोडून 350 फुटाचा आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मारकाचे काम वेगाने सुरू करण्याबाबतची मागणीही मुख्यमंत्र्यांनी मागणी मान्य केली असल्याचे सांगितले.
राज्यमंत्री आठवले यांनी नुकताच राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला होता. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून दुष्काळी भागाला पाणी देणे आणि कायमस्वरूपी दुष्काळ निवारण करणे याही मागण्या आठवलेंनी मुख्यमंत्र्यांपुढे ठेवल्या. त्यामुळे याही मागण्या मान्य केल्या असून लवकरच त्यावर कार्यवाही होईल अशी माहिती त्यांनी दिली. केंद्रातील राज्यमंत्री पदाबाबत आपण समाधानी असून राज्यातही रिपाइंला सन्मानजनक मंत्रीपद मिळेल असा विश्वास रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.