मुंबई :मुंबईत वर्षभरात मिसेल रूबेलाचे ( Mycelia rubella ) ९० रुग्ण आढळून आले आहेत. १ मुलाचा मृत्यू झाला असून ३ संशयित मृत्यू झाले आहेत. यानंतर आता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ( Union Ministry of Health and Family Welfare ) शहरातील गोवरच्या वाढत्या प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय पथक मुंबईत नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. हे संघ राज्य आरोग्य प्राधिकरणांना सार्वजनिक आरोग्य उपायांची स्थापना करण्यात मदत करेल आणि आवश्यक नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाय कार्यान्वित करण्यात मदत करणार आहे.
Mycelia rubella : मिसेल रूबेला गोवरच्या पार्श्वभूमीवर केंद्राची उच्चस्तरीय टीम मुंबईत
मुंबईत वर्षभरात मिसेल रूबेलाचे ( Mycelia rubella ) ९० रुग्ण आढळून आले आहेत. १ मुलाचा मृत्यू झाला असून ३ संशयित मृत्यू झाले आहेत. संघ राज्य आरोग्य प्राधिकरणांना सार्वजनिक आरोग्य उपायांची स्थापना करण्यात मदत करेल आणि आवश्यक नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाय कार्यान्वित करण्यात मदत करणार आहे.
सदस्यीय केंद्रीय टीम :मुंबईला जाणाऱ्या ३ सदस्यीय केंद्रीय टीममध्ये नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC), नवी दिल्ली, लेडी हार्डिंज मेडिकल कॉलेज (LHMC), नवी दिल्ली आणि प्रादेशिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे, महाराष्ट्र यांच्या तज्ञांचा समावेश आहे. या टीमचे नेतृत्व डॉ. अनुभव श्रीवास्तव, उपसंचालक, इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलन्स प्रोग्राम (आयडीएसपी), एनसीडीसी करत आहेत. मुंबईत गोवरच्या वाढत्या प्रकरणांचे व्यवस्थापन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपाय, व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रोटोकॉलच्या संदर्भात राज्याच्या आरोग्य विभागांना मदत करण्यासाठी आणि प्रादुर्भावाची तपासणी करण्यासाठी ही टीम विभागवार भेटी देखील घेणार आहेत.
मुंबईत ९० रुग्ण, १ मृत्यू :मुंबईमध्ये मिसेल रुबेला म्हणजेच गोवर आजाराचे रुग्ण वाढू लागेल आहेत. विशेष म्हणजे मुंबईमधील झोपडपट्टी विभागात या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. गेल्या वर्षभरात ९० रुग्ण आढळून आले असून त्यापैकी १ मृत्यू झाला आहे. तसेच ३ मृत्यू हे संशयित आहेत, त्यांचा अहवाल आल्यावर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास लहान मुलांचा मृत्यू होऊ शकतो. यासाठी मुंबईकरांनी लहान बालकांना वेळीच मिसेल रुबेलावरील लस द्यावी असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.