मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभरात परिवर्तन यात्रा आणि अनेक सभा सुरू आहेत. आज माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची पुण्यतिथी साजरी करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भावूक झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची पुण्यतिथी, राष्ट्रवादीचे नेते भावूक - Mumbai
आज माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची पुण्यतिथी साजरी करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भावूक झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
मुंबईतील बेलोर्ड पियर परिसरात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे पाटील यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
राज्यात आजच्या स्थितीत आर. आर. पाटील यांची पक्षाला आणि राज्यालाही उणीव भासत असल्याच्या भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या गटनेत्या नगरसेविका राखी जाधव, प्रदेश चिटणीस संजय बोरगे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवती अध्यक्षा अदिती नलावडे यांनीही अभिवादन करून आदरांजली वाहिली. यावेळी पक्षाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.