महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 1, 2020, 4:41 PM IST

ETV Bharat / state

'लालपरी'चे ७३ व्या वर्षात पदार्पण.. विटा आगारात केक कापून ग्रामस्थांनी साजरा केला वाढदिवस..

ग्रामस्थांच्यावतीने विटा आगारमध्ये असलेल्या एका एसटीला हारतुरे, पुष्पगुच्छ, नारळाच्या झावळ्या आणि फुग्यांनी सजवण्यात आले. तसेच सोशल डिस्टन्स पाळत यावेळी नारळ फोडून औक्षण करत केक कापण्यात आला. दरवर्षी आळसंद ग्रामस्थांच्यावतीने हा वाढदिवस साजरा करण्यात येतो.

ST BUS BIRTHDAY
लालपरीचा वाढदिवस

सांगली - सर्वसामान्यांची एसटी आज 72 व्या वर्षात पदार्पण करत आहे. प्रवासी सेवेत अविरतपणे कार्यरत असणाऱ्या या एसटीचा वाढदिवस सांगलीच्या विटा आगारामध्ये साजरा करण्यात आला आहे. कोरोनाच्या स्थितीतही धावू लागलेल्या एसटीचे औक्षण करत केक कापून आळसंद ग्रामस्थांच्या वतीने एसटीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

'लालपरीचा वाढदिवस'; विटा आगारात केक कापून ग्रामस्थांनी साजरा केला ७२ वा वाढदिवस..

बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाची साथीदार असलेली लालपरी.आज ७३ व्या वर्षात पदार्पण करत आहे. एसटीचा ७२ वा वाढदिवस साजरा होत असताना कोरोनाचे एक मोठे संकट एसटीवरसुद्धा आहे. मात्र, अशा परिस्थितीतसुद्धा सांगली जिल्ह्यात सर्वसामान्यांसाठी धावत आहे. याचीच जाणीव ठेवून सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातील आळसंद येथील ग्रामस्थांनी एसटीचा ७२ वा वाढदिवस साजरा केला आहे.

ग्रामस्थांच्यावतीने विटा आगारमध्ये असलेल्या एका एसटीला हारतुरे, पुष्पगुच्छ, नारळाच्या झावळ्या आणि फुग्यांनी सजवण्यात आले. तसेच सोशल डिस्टन्स पाळत यावेळी नारळ फोडून औक्षण करत केक कापण्यात आला. दरवर्षी आळसंद ग्रामस्थांच्यावतीने हा वाढदिवस साजरा करण्यात येतो. यंदाही कोरोनाच्या परिस्थितीतही एसटी महामंडळ आणि कर्मचाऱयांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या सेवेत सदैव कार्यरत राहण्याच्या उद्देशाने हा वाढदिवस साजरा करत शुभेच्छा दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details