सीबीएसईच्या सर्व परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलल्या
सीबीएसई मंडळाच्या या निर्णयानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा ३१ मार्च नंतर नवीन वेळापत्रकानुसार घेतल्या जातील. सीबीएसईने घेतलेल्या या निर्णयामुळे उद्या १९ ते ३१ मार्च दरम्यानच्या परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या असून त्याची विभागीय परीक्षा विभाग, शिक्षण मंडळे, शाळांनी तत्काळ अमंलबजावणी करावी, असे आदेश मंडळाने जारी केले आहेत.
सीबीएससीईच्या सर्व परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलल्या
मुंबई -देशात कोरोनाचा प्रभाव हा दुसऱ्या स्टेज मधून पुढे सरकत असून त्यामुळे येत्या काळात त्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीसह इतर सर्व परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी ही माहिती जारी केली आहे.
TAGGED:
cbse postpone exame dates