मुंबईCBI Raids On Railway Officials:या दोन्ही अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले असून 10 खासगी व्यक्ती आणि कंत्राटदार यांना रेल्वेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच दिल्याचे प्रकरण आहे. रेल्वे अधिकाऱ्यांची निवासस्थाने आणि कार्यालये या दोन्ही ठिकाणी सीबीआयची छापेमारी आणि झडती कारवाई आज करण्यात आली. (arrested on corruption charges)
सर्व अधिकारी स्टोअर्स विभागाचे:केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) मुंबईतील भ्रष्टाचार प्रकरणात भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे. ज्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ते पश्चिम रेल्वेचे दोन अधिकारी आहेत. तसेच मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्यासह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या अटक केलेल्यांनी कंत्राटदारांसह लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सर्व रेल्वे अधिकारी हे रेल्वेच्या स्टोअर्स विभागाचे आहेत. रेल्वेच्या तिन्ही अधिकाऱ्यांवर लाचखोरीचा आरोप आहे. या अटकेनंतर 12 ठिकाणी सर्च ऑपरेशनही करण्यात आले. या प्रकरणात अजूनही काही लोकांना अटक होऊ शकते.
हे आहेत अटकेतील अधिकारी:सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या मटेरियल मॅनेजमेंट विभागाचे उपमुख्य साहित्य व्यवस्थापक एच. नारायणन यांना मुंबई मुख्यालयातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह समीर देव आणि दीपक जैन या दोन खासगी कंत्राटदारांनाही अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही कंत्राटदार मेसर्स अर्नेस्ट इवाटा मदरसन प्रायव्हेट लिमिटेड, ग्रेटर नोएडा (UP) शी संबंधित आहेत. त्याचप्रमाणे, पश्चिम रेल्वेच्या ज्या दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी मटेरियल मॅनेजमेंट विभागाचे उपमुख्य मटेरियल मॅनेजर अतुल शर्मा आणि वरिष्ठ मटेरियल मॅनेजर एचडी परमार अशी अटक करण्यात आलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्यासोबत निमाई गुइन, तत्कालीन मार्केटिंग मॅनेजर आणि अमित कुमार, मार्केटिंग मॅनेजर, इंडस्ट्रियल फोर्ज अँड इंजिनिअरिंग कंपनी, जमशेदपूर, झारखंड यांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा:
- निधीचा अपहार केल्याप्रकरणी हिरे बंधूंवर गुन्हा दाखल; अडचणी आणखी वाढण्याची शक्यता
- आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, मालवाहू जहाजातून तब्बल २०० कोटी रुपयांचं कोकेन जप्त!
- पार्टी भोवली! पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये पार्टी करणारे चार पोलीस निलंबित