महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई पोलीस दलात खळबळ उडवणाऱ्या फेक पत्राप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Mumbai Women Police letter : मुंबई पोलीसांच्या मोटार परिवहन विभागातील ८ महिला पोलीसांनी त्यांचा वरिष्ठ पोलीसांकडून लैंगिक छळ होत असल्याची तक्रार पत्राद्वारे केल्याचं विविध माध्यमांतून समोर आलं आहे. या प्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात (Nagpada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nagpada Police Station
फेक पत्राप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 9, 2024, 10:35 PM IST

मुंबई Mumbai Women Police letter : मुंबई पोलीस दलातील खळबळ उडवून देणाऱ्या फेक पत्रासंदर्भात नागपाडा पोलीस ठाण्यात पत्रात नमूद असलेल्या एका महिला पोलिसाने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार नागपाडा पोलीस ठाण्यात (Nagpada Police Station) भारतीय दंड संविधान कलम 500, 509, 466, 467, 471 आणि माहिती आणि तंत्रज्ञान कायदा कलम 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती, सहपोलीस आयुक्त एस जयकुमार यांनी दिलीय.

महिला आयोगाने घेतली प्रकरणाची दखल : मुंबई पोलीसांच्या मोटार परिवहन विभागातील ८ महिला पोलीसांनी त्यांचा वरिष्ठ पोलीसांकडून लैंगिक छळ होत असल्याची तक्रार पत्राद्वारे केल्याचं विविध माध्यमांतून समोर आली. राज्य महिला आयोगाने देखील याची दखल घेतली आहे. पोलीस आयुक्त यांना या प्रकरणाची सत्यता पडताळून वस्तुस्थितीदर्शक अहवाल तत्काळ पाठवण्याचं निर्देश, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या प्रशासकीय अधिकारी संजना भुवड यांनी सोमवारी दिले. दरम्यान, मुंबई पोलीस महिलांवर झालेल्या लैंगिक शोषणाच्या फेक पत्राबाबत नागपाडा पोलीस ठाण्यात आठ महिलांपैकी एक महिला तक्रार देण्यासाठी सोमवारी गेली होती. या तक्रारीवरून नागपाडा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.


पत्रात ८ महिला कॉन्स्टेबलची नावं :याचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शुक्रवारपासून मुंबई पोलीसांच्या मोटार परिवहन विभाग नागपाडा येथील ८ महिला पोलीसांच्या नावे लैंगिक अत्याचाराचे आरोप करणारे पत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस आयुक्त, प्रशासन विभागाचे पोलीस सह आयुक्त, गुन्हे विभागाचे पोलीस सह आयुक्त आणि वाहतूक विभागाचे पोलीस सह आयुक्त, नागपाडा येथील मोटार परिवहन विभागाचे पोलीस उपायुक्त या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लिहिलं आहे. या पत्रात ८ महिला कॉन्स्टेबलची नावं आहेत.


महिला पोलिसांची केली विचारणा : विभागातील इन्स्पेक्टरपासून कॉन्स्टेबलपर्यंत सर्वांनीच लैंगिक अत्याचाराचे दुष्कृत्य केलं असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. नंतर हे पत्र वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. दरम्यान या पत्राची सत्यता पाहण्यासाठी पत्रात नमूद करण्यात आलेल्या आठ महिला पोलिसांना बोलावून अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता, असं काहीही नसून ते पत्र त्यांनी लिहिलं नसल्याचं उघडकीस आलं. अर्थात प्रशासन विभागाचे सहपोलीस आयुक्त एस. जयकुमार यांनी प्राथमिक स्थरावर हे पत्र फेक असल्याची माहिती दिलीय.

हेही वाचा -

  1. महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ उडवणारं 'ते' पत्र फेक; पोलिसांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करणार
  2. अखेर रश्मी शुक्लांनी स्वीकारला DGP पदाचा पदभार; म्हणाल्या, 'महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य'
  3. मुंबई पोलिसांनी सायबर गुन्हेगारांच्या तावडीतून ४८ तासात वाचवले गुन्ह्यातील ३.८० कोटी

ABOUT THE AUTHOR

...view details