मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल - mumbai news
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक असतानाही मास्क न वापणाऱ्या 1 हजार 240 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे 20 मार्च ते 17 एप्रिल दरम्यान दाखल झाले आहेत.
मुंबई- कोरोनाचे रुग्ण मुंबईत दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत विविध उपाय योजना प्रशासकीय स्तरावर केले जात आहेत. राज्यात लॉकडाऊनचा काळ 3 मेपर्यंत वाढवला असून पोलिसांकडून कलम 144 शहरात लागू करण्यात आलेला आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक असतानाही 20 मार्च ते 17 एप्रिल या दरम्यान मास्क न वापरणाऱ्या 1 हजार 240 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
20 मार्च ते 29 एप्रिल या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघण केल्यामुळे 5 हजार 532 प्रकरणात तब्बल 10 हजार 490 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या 1 हजार 234 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून तब्बल 2 हजार 692 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे , तर 6 हजार 564 आरोपींना जामिनावर पोलिसांनी सोडून दिण्यात आले आहे.
मागील 24 तासात मुंबई शहरात कलम 144 नुसार पोलिसांनी तब्बल 76 जणांवर कारवाई केली आहे. यामध्ये विनापरवाना हॉटेल आस्थापन सुरु ठेवणारे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे व अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. दक्षिण मुंबईत एकूण 5 जणांवर कारवाई करण्यात आलेली असून, मध्य मुंबई 26 तर पूर्व मुंबईत 1 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तर पश्चिम मुंबई 32 व उत्तर मुंबई 12 जणांवर अशी कारवाई मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.
हेही वाचा -'कोरोनाचा परिणाम देशासह राज्याच्या तिजोरीवर, महसुलातही होणार घट'