महाराष्ट्र

maharashtra

विना परवानगी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा

By

Published : May 14, 2020, 1:24 PM IST

डोंगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शायदा मार्गावरली बनातावाला इमारीतमध्ये मातम या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाते. या प्रकरणी आयोजक शब्बीर रिझवी या व्यक्तीवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देशात सर्वत्र संचारबंदी लागू आहे. संचारबंदीेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी धार्मिक कार्यक्रमांवरही बंदी घाल्यात आली आहे. मात्र, डोंगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शायदा मार्गावरली बनातावाला इमारीतमध्ये मातम या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाते. या प्रकरणी आयोजक शब्बीर रिझवी या व्यक्तीवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

डोंगरी पोलिसांना नियंत्रण कक्षावरुन मिळालेल्या माहितीवरून बनातावला इमारतीच्या 3 ऱ्या माळ्यावर जवळपास 35 ते 40 जण मातम या धार्मिक कार्यक्रमात भाग घेत असल्याचे आढळून आले. कोरोना संक्रमण लक्षात घेता का धार्मिक कार्यक्रमासाठी कुठलीही पोलीस परवानगी घेण्यात आलेली नव्हती. या प्रकरणी पोलिसांनी धार्मिक कार्यक्रमाचा आयोजक शब्बीर रिझवी या व्यक्तीच्या विरोधात भा.दं.वि.चे कलम 188, 269, 270 यासह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमचे कलम 51(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details