मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी कोरोना संदर्भात उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत. यासंदर्भात त्यांनी मंत्रीमंडळाची बैठक बोलावली आहे. पुण्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आल्यानंतर संपूर्ण राज्यात सतर्कता घेतली जात आहे. तसेच या पार्श्वभूमीवर 1ली ते 9 पर्यंतच्या शाळांना काही दिवस सुट्टी दिली जावी, असा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे.
कोरोना: १ ली ते ९ पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा प्रस्ताव, थोड्याच वेळात मंत्रीमंडळाची बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी कोरोना संदर्भात उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत. यासंदर्भात त्यांनी मंत्रीमंडळाची बैठक बोलावली आहे. पुण्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आल्यानंतर संपूर्ण राज्यात सतर्कता घेतली जात आहे.
थोड्याच वेळात मंत्रीमंडळाची बैठक
दरम्यान, लवकरच सुरु होणारे आयपीएलचे सामने मैदानात जाऊन न पाहता घरी टीव्हीवर पाहिले जावेत, असा प्रस्ताव सकाळी झालेल्या बैठकीत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. तर 1ली ते 9 पर्यंत च्या शाळांना काही दिवस सुट्टी दिली जावी असाही प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तसेच लग्नसमारंभ आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याबाबतही या बैठकीत निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.