महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मंत्रिमंडळाची मान्यता - cabinet video conference

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे होत असलेला संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात तातडीने विविध उपाययोजना, अधिसूचना आणि आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार महत्त्वाच्या उपाययोजनांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

Cabinet approves preventive measures
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना कॅबीनेटची मान्यता

By

Published : Apr 7, 2020, 8:06 PM IST

मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे होत असलेला संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात तातडीने विविध उपाययोजना, अधिसूचना आणि आदेश काढण्यात आले आहेत. 13 मार्च 2020च्या अधिसूचनेनुसार राज्यात साथरोग कायदा 1897 लागू करण्यात आला आहे. त्यानुसार उपाययोजनांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 13 मार्चला उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. इतर महत्त्वाच्या उपाययोजनांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

ही आहे उपाययोजना -

  • 13 मार्च 2020च्या अधिसूचनेनुसार राज्यात साथरोग कायदा 1897 लागू केला.
  • 14 मार्च 2020 रोजी महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अधिसूचना लागू झाली. त्याअंतर्गत अलगीकरण व विलगीकरण याबाबतचे नियम ठरविण्यात आले. तसेच अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई, खासगी रुणालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करणे याबाबी या नियमावलीमध्ये आहेत.
  • गर्दीमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
  • आपत्कालीन परिस्थितीत औषधे व यंत्रसामग्री आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान त्याचप्रमाणे संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये यांच्या स्तरावर समिती गठीत करून त्यांना काही अटी व शर्तीनुसार खरेदी करण्यास मुभा देण्यात आली.
  • वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग -
  • वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने गेल्या काही दिवसात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा, विविध परिषदांच्या नोंदणीकृत वैद्यक व्यवसायिक, सुश्रुषा सेवा, परावैद्यक व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती यांच्या सेवा अधिग्रहित करणे.
  • कोरोना विषाणूच्या अनुषंगाने सर्व शासकीय व खासगी रुग्णालयात स्वतंत्र विलगीकरण इमारत/कक्ष निर्माण करण्याच्या मार्गदर्शक सूचना देणे.
  • कोविड आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसर निर्जंतुकीकरण करणे.

ABOUT THE AUTHOR

...view details