मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक लोकसभा निवडणुकीमुळे बदलले जाणार आहे. तसेच देशभरात इन्स्टिट्युट ऑफ चार्टड अकाऊंट ऑफ इंडियाकडून घेण्यात येणाऱ्या सीएच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडणुकींचा प्रभाव, सीएचीही परीक्षा पुढे ढकलली - loksabha election
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक लोकसभा निवडणुकीमुळे बदलले जाणार आहे. तसेच देशभरात इन्स्टिट्युट ऑफ चार्टड अकाऊंट ऑफ इंडियाकडून घेण्यात येणाऱ्या सीएच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात आणि देशातील विद्यार्थ्यांना लोकसभा निवडणुकीचा फटका बसू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात आणि देशातील विद्यार्थ्यांना लोकसभा निवडणुकीचा फटका बसू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ही परीक्षा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार होती. त्यासाठीच्या तारखा जाहीर केल्या जाणार असतानाच आज ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले.
१७ व्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध संस्थानी आपल्या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता चार्टड अकाऊंट्सची परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आली आहे. सीएची परीक्षा २ ते १७ मे दरम्यान आयोजित करण्यात येणार होती. मात्र, या कालावधीत लोकसभा निवडणुका होणार असल्यामुळे सीएची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोजकांच्यावतीने घेण्यात आले आहे. आता ही परीक्षा २७ मे ते १२ जून या दरम्यान आयोजित करण्यात येतील.