मुंबई- मध्य रेल्वे मार्गावरील हेरिटेज स्थानकांच्या यादीत असलेल्या भायखळा स्थानकाचे रुपडे लवकरच पालटणार आहे. मुंबई सौंदर्यकरण प्रकल्पांतर्गत सामाजिक संस्था आय लव्ह मुंबई व मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमानाने भायखळा स्थानकाचे सुशोभीकरण व सौंदर्यकरणाचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. आज या प्रकल्पाच्या औपचारिक कामाचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते भायखळा स्थानकात उद्घाटन करण्यात आले.
125 वर्षे जुने असलेल्या या भायखळा स्थानकात लाकडी बांधकाम व कलाकुसर पाहायला मिळते. येथील काही भाग जीर्ण झाला आहे. त्यामुळे नव्याने भायखळा स्थानकातील मुख्य इमारत व दर्शनी भागाचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात येणार आहे.