महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कहर कोरोनाचा : व्यापाऱ्यांवर दुहेरी टांगती तलवार

सध्या सुरु असलेल्या संचारबंदीमुळे व्यापार शुन्य झाला असून कोरोनाच्या संकटातून बाहेर आल्यानंतर जी मंदी येणार आहे. त्याचे भीती व्यापाऱ्यांना सतावत आहे. यामुळे व्यापाऱ्यांवर दुहेरी समस्यांची टांगती तलवार लटकत आहे.

बाजार पेठ
बाजार पेठ

By

Published : Apr 7, 2020, 11:18 AM IST

मुंबई- कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. यामुळे संचारबंदी करण्यात आली आहे. याचा फटका समाजातील सर्व घटकांना बसला आहे. सर्व व्यापार, बाजारपेठा ठप्प झाल्या झाल्या आहेत. यामळे काही व्यापाऱ्यांवर शून्य व्यापार आणि मंदी, अशी दुहेरी समस्यांची तलवार लटकत आहे.

व्यथा मांडताना व्यापारी

दक्षिण मुंबईतील महत्वाचा मानल्या जाणाऱ्या काळंबादेवी, जवेरी बाजार अशा महत्वाचा बाजारपेठा गर्दीने गजबजलेल्या असतात. मात्र, संचारबंदीमुळे संपूर्ण परिसरात शुकशुकाट पसरला आहे. येथील काही व्यापाऱ्यांशी संवाद साधला असता संचारबंदीनंतरच्या आर्थिक परस्थिती बद्दलची धास्ती प्रकर्षाने जाणवली. काळबादेवीतील व्यापाऱ्यांशी बोलताना काही व्यापाऱ्यांचे म्हणणे होते की सरकारने आम्हाला काही काळासाठी टॅक्समध्ये सवलत द्यावी. जेणेकरून आर्थिक ताण येणार नाही.

रोजच्या रोज व्यापार करुन आपले पोट भरणाऱ्या व्यापाऱ्यांचे मोठे हाल होत असून त्यांच्या जेवणाचेही हाल होत आहेत. संचारबंदीनंतर येणाऱ्या मंदीची भीती असल्याचे दिसत होते.

हेही वाचा -अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता

ABOUT THE AUTHOR

...view details