प्रतिक्रिया देतांना अॅड सादिक अली मुंबई :उद्योगपती सायरस मिस्त्री (Businessman Cyrus Mistry) अपघात प्रकरणी (Cyrus Mistry accident case) मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली आहे. सदर प्रकरणात पोलिसांकडून तपास योग्यरितीनं झाला नसल्याचा याचिकेत आरोप करण्यात आला आहे. या याचिकेवर आज प्रभारी मुख्य न्यायाधीश यांच्या अंतर्गत सुनावणी पार पडली. त्यावेळी याचिकाकर्त्यांना महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर का दादा मागितली नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. तसेच याचिकाकर्त्यांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश पुढील तारखेपर्यंत दिले आहे. या याचीकेवर पुढील सुनावणी 17 जानेवारी (Next hearing on January 17) रोजी होणार आहे.
दंडाधिकारी कोर्टातही दाद मागता येईल :सायरस मिस्त्री प्रकरणात स्थानिक रहिवासी संदेश जेधे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज झालेल्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला आहे की, सदर याचिकेतील मागण्यांकरता दंडाधिकारी कोर्टातही दाद मागता येईल, यावर कोर्टाने याचिकाकर्त्यांना आपली बाजू स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
अनाहिता पंडोले नशेत असल्याचा आरोप :मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेत गाडी चालवणा-या अनाहिता पंडोले नशेत असल्याचा याचिकाकर्त्यांचा वकिलांचा आरोप आहे. मात्र सरकारी वकिलांनी हे आरोप फेटाळलेत, तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचा दावा सरकारी वकीलांनी आज सुनावणी दरम्यान केला. सदर याचिकेवरील सुनावणी 17 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. मात्र पुढील सुनावणी नंतर आम्ही आमची पुढची कायदेशीर भूमिका घेणार आहोत, असं याचिकाकर्त्यांचे वकील एड सादिक अली यांनी सांगितलं आहे
काय आहे प्रकरण :उद्योगपती सायरस मिस्त्री अपघात संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सायरस मिस्त्री अपघात प्रकरणात पोलीसांकडून करण्यात आलेल्या तपासावर अनेक प्रश्न या याचिकेत उपस्थित करण्यात आले आहे. पालघर पोलिसांकडून करण्यात येणारा तपासावर याचिकर्त्याचा अनेक आक्षेप घेण्यात आले आहे. यात दाखल गुन्ह्यात कलम 304 देखील लावण्यात लावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. पालघर येथील संदेश शिवाजी जेधे यांनी एड सादिक अली यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे.
कोण होते सायरस मिस्त्री? :सायरस मिस्त्री यांची ओळख एक यशस्वी उद्योगपती अशी होती. त्यांचा जन्म 4 जुलै 1968 साली झाला होता. 28 डिसेंबर 2012 रोजी त्यांना टाटा समूहाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यानंतर 24 ऑक्टोबर 2016 रोजी त्यांना या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले होते. ते टाटा समुहाचे सहावे अध्यक्ष होते. त्यानंतर हा वाद कोर्टातही गेला होता. भारतात आणि इंग्लंडमध्येही सर्वाधिक महत्तवाचे उद्योगपती अशा पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.