महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई बस मालक संघटनेचे 'मूक आंदोलन', दखल न घेतल्यास बसेस आरटीओत जमा करण्याचा इशारा - best committee mumbai news

लॉकडाऊनमुळे खासगी बस वाहतुकीला गेल्या तीन महिन्यात चांगलाच फटका बसला. वाहतूकदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे, सरकारचे लक्ष वेधण्याकरता मुंबई बस मालक संघटनेने आज मूक आंदोलन केले.

मुंबई बस मालक संघटनेचे 'मूक आंदोलन'
मुंबई बस मालक संघटनेचे 'मूक आंदोलन'

By

Published : Jun 15, 2020, 6:37 PM IST

मूक आंदोलन करताना मुंबई बस मालक संघटनेचे कार्यकर्ते

मुंबई -कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेले अडीच महिने खासगी बस वाहतूक सेवा बंद आहे. आज(सोमवार) मुंबई बस मालक संघटनेतर्फे राज्य सरकारकडे आपल्या मागण्या पोहचविण्यासाठी सोशल डिस्टंन्सिंग ठेवून "मूक आंदोलन" करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेले निर्बंध आणि लॉकडाऊनमुळे खासगी बस वाहतुकीला गेल्या तीन महिन्यात चांगलाच फटका बसला. वाहतुकदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे, सरकारचे लक्ष वेधण्याकरता मुंबई बस मालक संघटनेने मूक आंदोलन केले. दरम्यान, येथील कार्यकर्त्यांनी कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करत सोशल डिस्टन्सिंग पाळत आंदोलन केले. तसेच, वाहतूकदार व्यावसायिकांना राज्य सरकारने त्वरित सर्वतोपरी मदत करावी ही प्रमुख मागणी यावेळी संघटनेतर्फे करण्यात आली. तर, येत्या दहा दिवसात सरकारने यावर तोडगा काढला नाही. तर, सर्व बसेस आरटीओला परत करण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला.

गेल्या तीन महिन्यापासून आम्ही सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. मात्र, अद्याप आमची कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. 1 वर्षांसाठी कर सवलत मिळावी, 60 दिवस किमान इन्शुरन्सचे हफ्ते भरण्यास मुदतवाढ मिळावी, आदी मागण्या सरकारने मान्य कराव्यात असे संघटनेचे सचिव हर्ष कोटक यांनी सांगितले. यावेळी मुंबई बस मालक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details