मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग टँकरचा थरार पाहायला मिळाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने टॅंकर दुभाजकावर धडकले, या अपघातानंतर टॅंकरने अचानक पेट घेतला. आगीमध्ये टॅंकर जळून खाक झाले आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग टँकरचा थरार - Mumbai News Update
अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग टँकरचा थरार पाहायला मिळाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने टॅंकर दुभाजकावर धडकले, या अपघातानंतर टॅंकरने अचानक पेट घेतला. आगीमध्ये टॅंकर जळून खाक झाले आहे.
अशी घडली घटना
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर मधील आंबोली येथे टँकरचा अपघात झाला. गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणारा टॅंकर दुभाजकाला आदळल्याने अपघात घडला. अपघातानंतर टॅंकरने अचानक पेट घेतला. रस्त्याच्या मधोमध टँकरने पेट घेतल्याने काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पेट्रोल पंपा शेजारीच टँकरने पेट घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. टँकरला आग लागल्याचे कळताच प्रसंगावधान दाखवत चालक आणि वाहकाने टॅंकरमधून उडी मारल्याने, ते थोडक्यात बचावले.