मुंबई- जून महिन्याचा शेवटचा आठवडा संपत आला आहे, तरीही राज्यात मान्सूनची हजेरी नाही. पाऊस लांबल्यामुळे सर्वच धर्मांतील साधू संत, धर्मगुरू प्रार्थना व वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक विधी करत आहेत. लांबलेला पाऊस लवकर पडावा तसेच दुष्काळाची तीव्रता कमी व्हावी यासाठी भांडुप पश्चिमच्या राजगृह बुद्ध विहारात बौद्ध भिक्खुंनी विशेष प्रार्थना केली.
पावसासाठी भांडुपमध्ये बौद्ध भिक्खुंतर्फे विशेष 'बुद्धवंदना' - बौद्ध भिक्षू
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची भीषणता पहायला मिळाली. दुष्काळाच्या तीव्रतेने मनुष्य व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा मान्सूनचा पाऊस गायब झाला आहे. पाऊस वेळेवर कोसळत नसल्याने शेतकरी व सामान्य माणूस चिंतेत आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची भीषणता पहायला मिळाली. दुष्काळाच्या तीव्रतेने मनुष्य व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा मान्सूनचा पाऊस गायब झाला आहे. पाऊस वेळेवर कोसळत नसल्याने शेतकरी व सामान्य माणूस चिंतेत आहे. पाऊस कमी पडण्यासाठी वातावरणातील असमतोलता निर्माण झाली आहे. तापमानात होणारी वाढ कमी करण्यासाठी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडांची वाढ होणे महत्त्वाचे आहे. दर वर्षी वृक्षारोपण केले जाते, पण ते वृक्ष वर्षभर तरी जगतात का हे कोणीही पाहत नाही. जंगल तोडून औद्योगिक विकास करण्याच्या नावाने होत असलेली वन संपदा संपत चालली आहे. त्यामुळे पशु पक्षी व मानव यांचे आयुष्य कमी होत चालले आहे. सर्वांनी वेळीच जागे होत निसर्गाचा समतोल राखण्यासाठी उपाययोजनांची पाऊले उचलली पाहिजेत.
भांडुपच्या राजगृह बुद्धविहारात लांबलेला पाऊस मुंबईत यावा यासाठी बौद्ध भिक्खुंच्याहस्ते विशेष बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी नागरिक व बौद्ध भिक्खु यांची उपस्थिती होती. यावेळी बौद्ध भिक्खुंनी झाडांच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्र येत निसर्गाचे संगोपन केले पाहिजे.व गौतम बुद्ध व निसर्गाचे जवळचे नाते असल्याचे बौद्ध भिक्खु धम्मपाल यांनी यावेळी सांगितले.