महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तरुणाचा धारदार हत्याराने वार करून निर्घृण खून - mumbai latest news

शकी राजाराम गायकवाड 31 वर्षीय युवकाचा धारदार हत्याराने गळ्यावर ,तोंडावर व शरीरावर वार करून निर्घृण खून करण्यात आलेला होता. यासंदर्भात कुठलेही धागेदोरे किंवा सीसीटीव्ही फूटेज नसताना सुद्धा पोलीसांनी आरोपींचा शोध घेत 2 आरोपींना अटक केली आहे.

तरुणाचा निर्घृण खून
तरुणाचा निर्घृण खून

By

Published : Jun 4, 2021, 1:48 PM IST

मुंबई - 25 मे रोजी मुंबईतील वडाळा परिसरामध्ये शकेंद्र उर्फ शैलेंद्र उर्फ शकी राजाराम गायकवाड 31 वर्षीय युवकाचा धारदार हत्याराने गळ्यावर ,तोंडावर व शरीरावर वार करून निर्घृण खून करण्यात आलेला होता. यासंदर्भात कुठलेही धागेदोरे किंवा सीसीटीव्ही फूटेज नसताना सुद्धा पोलीसांनी आरोपींचा शोध घेत 2 आरोपींना अटक केली आहे.


गुंडांच्या भीतीने नागरिक देत नव्हते माहिती

शकेंद्र उर्फ शैलेंद्र या युवकाचा जुन्या भांडणाच्या रागातून खून करण्यात आल्यानंतर, घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते .मात्र ,ज्या ठिकाणी खून झाला होता, त्या ठिकाणी कुठलेही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे पोलीसांच्या हाती सुरुवातीच्या टप्प्यात कुठलेही धागे-दोरे सापडत नव्हते. ज्या ठिकाणी खून करण्यात आलेला होता त्या परिसरातील नागरिकांकडे पोलीसांनी चौकशी सुरू केली असता, आरोपींच्या भीतीपोटी कुठल्याही नागरिकाने पोलीसांना माहिती दिलेली नव्हती. मात्र पोलीसांनी तांत्रिक तपास करत या प्रकरणातील मुख्य आरोपी अंकित अजय कांबळी (23), व तेजस संजय निकाळजे (19) या दोन आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी या आरोपींना सुनावले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details