मुंबई - अचानक छातीत दुखू लागल्याने, वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लारा याला मुंबईतील ग्लोबल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या सुरु असलेल्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेचा समालोचक ब्रायन लारा आहे. तो मुंबईत आला असून मंगळवारी अचानक त्याचा छातीत दुखू लागले. त्यामुळे त्याला मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेले काही दिवस ब्रायन लारा मुंबई-इंग्लंड असा प्रवास करत आहे.
छातीत दुखू लागल्याने ब्रायन लारा मुंबईतील रुग्णालयात दाखल - mumbai
मंगळवारी ब्रायन लाराच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्याला मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले असून रिपोर्ट नॉर्मल असल्याचे सांगण्यात आले आहे.
छातीत दुखू लागल्याने, वेस्ट इंडिजचा खेळाडू ब्रायन लारा मुंबईतच्या ग्लोबल रुग्णालयात अॅडमिट
विश्वकरंडक स्पर्धेच्या निमित्ताने, स्टार स्पोर्ट्स वाहिनीच्या कार्यक्रमासाठी वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लारा मुंबईमध्ये दाखल झाला आहे. तो या वाहिनीच्या कार्यक्रमाचा सदस्य आहे. मंगळवारी त्याच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्याला मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले असून रिपोर्ट नॉर्मल असल्याचे सांगण्यात आले आहे.
Last Updated : Jun 25, 2019, 4:55 PM IST