महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आचारसंहितेचा भंग; धनंजय मुंडेंच्या विरोधात तक्रार दाखल - ncp

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मुंबईतील मरीन ड्राइव पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

धनंजय मुंडे

By

Published : Apr 3, 2019, 6:54 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसकडून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मुंबईतील मरीन ड्राइव पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी पक्षाचा जाहीरनामा २५ मार्चला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंत्रालयासमोरील बी-४ या शासकीय निवासस्थानी माध्यमांसमोर प्रसिद्ध केला होता. नियमांनुसार आचारसंहितेच्या काळात कोणत्याही जाहीरनाम्याच्या घोषणेसाठी शासकीय कार्यालय किंवा निवासस्थान यांचा वापर करणे गुन्हा आहे. या प्रकरणाची चौकशी करुन याबाबत तक्रार नोंदवण्याचे निर्देश निवडणूक अधिकाऱ्यांनी 'ए' वॉर्डला दिल्याने त्यानुसार, मुंबई पोलिसांच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग प्रकरणी राष्ट्रवादी पक्षाविरोधात तक्रार दाखल करुन पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details