महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Anil Jaisinghani Property Seized : बुकी अनिल जयसिंघानीला दणका, 3 कोटी 40 लाखांची संपत्ती ईडीकडून जप्त - Cricket Betting

बुकी अनिल जयसिंघानीला ईडीने आणखी एक धक्का दिला आहे. त्यांची 3.40 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. क्रिकेट सट्टेबाजी सोबतच अनिल जयसिंघानी यांनी ही मालमत्ता फसवणुकीने मिळवल्याचे तपासात समोर आले आहे.

Anil Jaisinghani Property Seized
Anil Jaisinghani Property Seized

By

Published : Jun 17, 2023, 10:57 PM IST

मुंबई :गुजरातचे बुकी अनिल जयसिंघानीला ईडीने मोठा धक्का धक्का दिला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनिल जयसिंघानी यांची ३ कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. शनिवारी अधिक माहिती देताना ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पीएमएलए कायद्यांतर्गत मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी अनिल जयसिंघानीची ३.४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

जयसिंघानी यांच्यावर आरोपपत्र :अनिल जयसिंघानी यांच्यावर आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. हे प्रकरण गुजरातमधील वडोदरा येथे 2015 मध्ये नोंदवलेल्या एफआयआरशी संबंधित आहे. क्रिकेट सट्टेबाजी सोबतच अनिल जयसिंघानी यांनी ही मालमत्ता फसवणुकीने मिळवल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर 2015 मध्ये ईडीने अनिल जयसिंघांनी यांना समन्स पाठवले होते.

जयसिंघानीच्या दोन घरांवर छापे :परंतु पीएमएलए कायद्याशी संबंधित या प्रकरणात सहकार्य न केल्याने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. यासोबतच 2015 मध्ये ईडीच्या गुजरात युनिटने जयसिंघानीच्या दोन घरांवर छापे टाकून त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. पण तेव्हा त्यांना पकडण्यात यश आले नव्हते. आरोपी अनिल जयसिंघानी 2015 पासून फरार होते. त्यानंतर ईडीने त्यांना एप्रिल महिन्यात अटक केली होती.

३ कोटींची मालमत्ता जप्त : बुकी अनिल जयसिंघानी याला ईडीने 18 एप्रिल 2023 ला अटक केली होती. अहमदाबादमधील PMLA कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर ९ जूनला ईडीने अनिल जयसिंघानी यांच्या घरावर छापा टाकला होता. नंतर १७ जूनला आरोपीची ३ कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली.

विविध राज्यांमध्ये एकूण 17 गुन्हे : अनिल जयसिंघानी हा कुप्रसिद्ध बुकी असून तो उल्हासनगरचे रहिवासी आहे. या प्रकरणाबाबत बोलायचे झाले तर, अनिल जयसिंघानी यांच्यावर विविध राज्यांमध्ये एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. तब्बल 8 वर्षे फरार असलेले अनिल जयसिंघानी हे अखेर या वर्षी एप्रिल महिन्यात ईडीच्या हाती लागले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details