मुंबई :अरुण गवळी याच्यावर 2007 मध्ये मुंबईत शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांना गोळ्या झाडून त्यांचा खून केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयानं त्याबाबत शिक्षा सुनावलेली आहे. या प्रकरणात 2008 पासून अरुण गवळी तुरुंगात आहे. 2012 मध्ये त्याबाबत त्याला शिक्षा सुनावली गेलीय. तो अनेक वर्षे तुरुंगात आहे. आरोपी म्हणून विशेष रजा अंतर्गत त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये सुट्टी मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने तो अर्ज तूर्तास नाकारलाय.
संचित रजेसाठी कारागृह उपमहानिरीक्षकांकडे अर्ज :मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय जोशी व वाल्मिकी मेनेझेस यांच्यासमक्ष ही सुनावणी झाली. अरुण गवळीने संचित रजेसाठी कारागृह उपमहानिरीक्षकांकडे अर्ज सादर केला होता. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळं कारागृह अधीक्षकांनी निर्णय घेतला नाही. अखेर अर्ज नागपूर खंडपीठासमोर सादर झाला. त्यावेळी न्यायालयासमोर तुरुंग अधीक्षकांनी निरीक्षण नोंदवले की, अत्यंत गंभीर गुन्हा असल्यामुळं सुट्टी देता येणार नाही.
Arun Gawli : अरुण गवळीला तूर्तास दिलासा नाही, उच्च न्यायालयाने नाकारलाय तुरुंगातून 'सुट्टी मिळण्याच्या अर्ज' - कमलाकर जामसंडेकर यांचा खून
मुंबईत एका खून खटल्याच्या प्रकरणात अरुण गवळीला 2018 मध्ये अटक केली गेली होती. 2000 मध्ये त्याला कनिष्ठ न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. त्याने विशेष रजा याचिकांतर्गत न्यायालयातून सुट्टी मिळावी, असा अर्ज दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं त्याचा अर्ज नाकारलाय. मात्र, तुरुंग उपमहानिरीक्षक यांना 14 सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेत. न्यायमूर्ती विनय जोशी व वाल्मिकी मेनेझेस यांनी हे निर्देश दिले.
Published : Aug 24, 2023, 2:22 PM IST
नियमांचं काटेकोरपणे पालन : मात्र अरुण गवळीने तुरुंग अधीक्षकांचा दावा न्यायालयामध्ये खोडून काढण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी जेव्हा रजेवर काही काळ न्यायालयाने सूट दिली होती. त्यावेळेला कुठल्याही प्रकारच्या नियमांना डावललेलं नाहीय. सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं होतं. शिस्तीमध्ये रजा सुट्टी भोगून अरुण गवळी परत तुरुंगात दाखल झाला होता. त्यामुळं न्यायालयाने या अर्जावर विचार करावा, अशी विनंती खंडपीठासमोर अरुण गवळीचे वकील ॲड. मीर नगमान अली यांनी केलीय.
काय आहे मूळ प्रकरण :मुंबईच्या अंधेरी उपनगरामधील शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांचा त्यांच्या राहत्या घरी खून झाला होता. हा खून अरुण गवळीच्या इशाऱ्यावरून करण्यात आला होता. तसंच त्या खुनासाठी 30 लाख रुपये देखील देण्यात आल्याचं चौकशीमध्ये समोर आलंय. खटल्यामध्ये अरुण गवळीला दोषी सिद्ध झाल्यानंतर 2012 मध्ये शिक्षा सुनावली गेली. त्याने मुंबई कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर त्या शिक्षेच्या विरोधात आव्हान याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने देखील ही शिक्षा कायम ठेवलेली आहे. सध्या अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
हेही वाचा :