Actress Cheating : अभिनेत्री रिमी सेनची गुंतवणुकीच्या नावाखाली 4.14 कोटी रुपयांची फसवणूक
बॉलीवूड अभिनेत्री रिमी सेनने (Actress Rimi Sen) गुंतवणुकीच्या नावाखाली 4.14 कोटी रुपयांची फसवणूक (Fraud in the name of investment) केल्याप्रकरणी रौनक जतिन व्यास नावाच्या गोरेगाव येथील व्यावसायिकाविरुद्ध पोलिसात तक्रार केली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपींचा शोध सुरू आहे अशी माहिती खार पोलिसांनी (Khar police) दिली आहे
मुंबई:अभिनेत्री रिमी सेनने गोलमाल, धूम, फिर हेरा फेरी आदी चित्रपटांत काम केले आहे. रिमी सेनने गुंतवणुकीच्या नावाखाली 4.14 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोरेगाव येथील रौनक जतिन व्यास नावाच्या व्यावसायिकाविरुद्ध खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत तिने तीन वर्षांपूर्वी अंधेरी भागात भेटलेल्या रौनक जतिन व्यासने फसवणूक केल्याचा उल्लेख केला आहे. आरोपीने स्वत:ला व्यापारी आहे. असा दावा केला आणि 40 टक्के परतावा देऊन तिला त्याच्या कंपनीत गुंतवणूक करण्याची ऑफर दिली होती. रिमी सेनने अंतिम मुदत संपल्यानंतर पैशाची मागणी केली तेव्हा त्याने दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली त्यानंतर तीला फसवणूक झाल्याचे लक्षात झाले. त्यामुळे तिने फसवणूक आणि विश्वासघात झाल्या बद्दल तक्रार दाखल केली.