मुंबई:हत्येचे कारण जवळपास स्पष्ट झाले असून त्या संदर्भात काही पुरावे गोळा केल्यानंतर ते कारण उघड केले जाणार आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी भक्कम पुरावे गोळा करण्यावर भर दिला आहे. त्याचप्रमाणे आरोपी मनोज साने याला असलेल्या दुर्धर आजाराबाबत कोणतीही वैद्यकीय तपासणी अद्याप करण्यात आलेली नसल्याचे देखील बजबुळे यांनी पुढे सांगितले.
हत्येचा उद्देश स्पष्ट करण्यात यश:हत्येचा नेमका उद्देश काय आहे, त्याचा शोध घेण्यास पोलिसांना जवळपास यश आले आहे. काही गोष्टींची खातरजमा केल्यानंतर हत्येचे कारण उघड केले जाणार आहे. साने राहत असलेल्या इमारतीमधील ४ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्याची पडताळणी केली जात आहे. शनिवारी मनोज सानेचे चुलत काका आणि चुलत भावांचे जबाब पोलिसांनी नोंदवले. साने बरोबर आमचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. मला दुर्धर आजार असल्याचे साने याने पोलिसांना सांगितले होते; परंतु बचाव करून सहानभूती मिळविण्याचा हा प्रकार आहे. त्या आजाराची वैद्यकीय चाचणी देखील केली जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्या आजारामुळे हत्या केली नसल्याचे त्याचा काहीच संंबंध नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्याने दिली.