महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बनावट फेसबूक खाते प्रकरणी बॉडी बिल्डर खामकरांची पोलिसात तक्रार

शरीर सौष्ठवपटू सुहास खामकर यांचे देश, विदेशात अनेक चाहते आहे. त्यांचे समाज माध्यमात अनेक फॉलोवर्स आहेत. याचाच फायदा काही समाज कंटक घेत आहेत. खामकर यांच्या नावाचे समाज माध्यमांवर बनावट खाते तयार करून महिला व मुलींशी नको तो संवाद साधला जात आहे.

शरीर सौष्ठवपटू सुहास खामकर

By

Published : Sep 16, 2019, 10:04 AM IST

मुंबई- सुहास खामकर यांनी आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत देश विदेशात अनेक किताब मिळविले आहेत. मात्र त्यांच्या नावाचा गैरफायदा घेत बनावट फेसबूक खाते उघडून कोणीतरी महिला आणि मुलींना फसवत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सुहास खामकर यांनी टिळकनगर पोलिसात तक्रार दिली आहे.

याबाबत माहिती देतना शरीर सौष्ठवपटू सुहास खामकर

शरीर सौष्ठवपटू सुहास खामकर यांचे देश, विदेशात अनेक चाहते आहे. त्यांचे समाज माध्यमात अनेक फॉलोवर्स आहेत. याचाच फायदा काही समाजकंटक घेत आहेत. खामकर यांच्या नावाचे समाज माध्यमांवर बनावट खाते तयार करून महिला व मुलींशी नको तो संवाद साधला जात आहे. अनेकवेळा तर त्यांना सुहास खामकर बोलतो असे म्हणून कॉल केला जातो आणि त्यांच्याशी नको त्या विषयी बोलले जाते. या प्रकारामुळे सुहास खामकर यांची बदनामी होत आहे.

हेही वाचा-राममंदिराची पहिली वीट रचण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे - उद्धव ठाकरे

याबाबत खबरदारी म्हणून आणि या तोतया विरोधात खामकर यांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. तर याप्रकरणी सायबर कक्षाद्वारे चौकशी होणार आहे. सुहास खामकर नावाने जी खाते आहेत, ती व्हेरिफिकेशन केलेली म्हणजे, निळी टिकमार्क केलेली आहेत. त्यामुळे कोणीही इतर खात्यांवर व्यवहार करू नये. जर आपणास कोणी खोटा फोन केला तर माझ्याशी अथवा पोलिसांशी संपर्क साधावे असे आवाहन सुहास खामकर यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details