महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Eastern Freeway Mumbai: नागरिकांना लवकरच मिळणार दिलासा; 'ईस्टर्न फ्री वे'च्या दुरुस्तीसाठी पालिका करणार २४ कोटी खर्च - ईस्टर्न फ्री वेवरती अनेक ठिकाणी दुरुस्ती

मुंबईतील ईस्टर्न फ्री वेवरती अनेक ठिकाणी दुरुस्तीची गरज निर्माण झाली होती. ही बाब मुंबई महापालिकेने गांभीर्याने घेतली. लवकरच या रस्त्याची दुरुस्ती केली जाणार आहे.

Eastern Freeway Mumbai
मुंबई महानगरपालिका

By

Published : Mar 30, 2023, 10:47 AM IST

मुंबई : रस्त्यावरील खड्डे, खडबडीतपणा हा प्रवासातील मोठा अडथळा आहे. पूर्व उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पूर्व मुक्त मार्ग म्हणजेच ईस्टर्न फ्री वे उभारण्यात आला होता. या मार्गावरती अनेक ठिकाणी दुरुस्तीची गरज निर्माण झाली आहे. पालिकेने या कामासाठी गेल्या वर्षी निधीची तरतूद केली होती. मात्र त्याला मुहूर्त सापडत नव्हता. अखेर पालिकेला या कामासाठी मुहूर्त सापडला आहे. लवकरच या रस्त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. या कामासाठी पालिका २४ कोटी ४१ लाख रुपये खर्च करणार आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आणि वाहनचालकांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे.

शहरात पोहचणे झाले सोपे :मुंबईच्या पूर्व उपनगरामधून शहरांमध्ये मंत्रालय विधान भवन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी येण्यासाठी तासनतास वाहतूक कोंडीमधून मार्ग काढत प्रवास करावा लागत होता. हा त्रास कमी करण्यासाठी एमएमआरडीएने सन २०१० मध्ये पी डि'मेलो रोड ते मानखुर्द गोवंडीदरम्यान १६.८ किमीचा पूर्व मुक्त मार्ग बांधला. मुंबई महापालिकेकडे २०१५ मध्ये ईस्टर्न फ्री वे देखभालीसाठी हस्तांतरित करण्यात आला आहे. या मार्गामुळे पूर्व उपनगरातून २० ते २५ मिनिटांमध्ये मुंबई शहरामध्ये पोहोचणे सोपे झाले. या मार्गामुळे वाहतुकीचा प्रश्न निकाली निघाला आहे. प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे.

रस्त्याची दैनावस्था :मुंबई महानगरपालिकेकडे हा मार्ग हस्तांतरित झाल्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये कोणतेही मोठ्या प्रमाणात दुरुस्तीचे किंवा देखभालीचे काम झाले नव्हते. त्यामुळे या मार्गावर वडाळा भक्ती पार्क ते म्हैसूर काॅलनी, पांजरापोळपर्यंतच्या पट्ट्यात रस्त्यावरील काँक्रीटचा थर खडबडीत झाला आहे. त्यामुळे गाडी चालवताना वाहनचालक त्रास सहन करत आहे. वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याच मार्गावर असलेल्या बोगद्यात पाण्याची गळती झाली आहे. विजेचे दिवे बंद पडल्यामुळे अंधार झाला आहे.

वर्षभराच्या कालावधीनंतर मुहूर्त :ईस्टर्न फ्री वेच्या दुरुस्तीसाठी पालिकेने मार्च २०२२ मध्ये २७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र या कामाला महापालिकेला मुहूर्त सापडत नव्हता. अखेर वर्षभराच्या कालावधीनंतर महापालिकेला या रस्त्याच्या दुरुस्तीचा मुहूर्त मिळालेला आहे. ईस्टर्न फ्री वेच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार आहे. आता या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रस्त्याच्या दुरूस्तीमुळे दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा : Marriage Certificate: मुंबईकरांना आता ‘डिजीलॉकर’मध्ये मिळणार विवाह नोंदणी प्रमाणपत्र, बीएमसीचे तंत्रस्नेही पाऊल

ABOUT THE AUTHOR

...view details