मुंबई- आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाला कर्जातून बाहेर काढण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. यासाठी पालिका बेस्टला 1200 कोटी रुपये देणार आहे. बेस्टला 1200 कोटी रुपये द्यायला पालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांनी मंजुरी दिली आहे.
बेस्टला कर्जमुक्त करण्यासाठी पालिका देणार 1200 कोटी - कर्जमुक्त
बेस्ट उपक्रम आर्थिक अडचणीत आहे. बेस्टवर अडीच हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. यामुळे बेस्टला कोणत्याही बँका मोठे कर्ज देत नाही. बेस्ट हा मुंबई महापालिकेचा उपक्रम असल्याने पालिकेने पुढाकार घेऊन बेस्टला कर्जातून बाहेर काढण्याची मागणी केली जात होती. मात्र, तत्कालीन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बेस्टला एक रुपयाही द्यायचा नाही, अशी भूमिका घेतली होती
बेस्ट उपक्रम आर्थिक अडचणीत आहे. बेस्टवर अडीच हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. यामुळे बेस्टला कोणत्याही बँका मोठे कर्ज देत नाही. बेस्ट हा मुंबई महापालिकेचा उपक्रम असल्याने पालिकेने पुढाकार घेऊन बेस्टला कर्जातून बाहेर काढण्याची मागणी केली जात होती. मात्र, तत्कालीन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बेस्टला एक रुपयाही द्यायचा नाही, अशी भूमिका घेतली होती.मात्र, पालिका आयुक्तपदी प्रविणसिंह परदेशी यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच बेस्टला दरमहा 100 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता नुकत्याच झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत बेस्टला कर्जमुक्त करण्यासाठी 1200 कोटी रुपये देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे बेस्टवरील कर्ज कमी करण्यास मदत होणार आहे.
याबाबत विरोधी पक्ष नेते रवी राजा यांच्याशी संपर्क साधला असता पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत बेस्टला 1200 कोटी रुपये देण्याबाबत चर्चा झाली. सर्वपक्षीय गटनेत्यांनी त्याला एकमताने मंजुरी दिली असून या निर्णयाचे सर्व पक्षीय गटनेत्यांनी स्वागत केले असल्याचे सांगितले. पालिकेने 1200 कोटी रुपये दिल्यावर बेस्टने आपल्या कारभारात सुधारणा करून तोटा कमी करावा, असे आवाहन रवी राजा यांनी केले आहे.