मुंबई - सीएसएमटी येथील पुलाच्या दुर्घटनेनंतर धोकादायक पुलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अंधेरी येथील गोखले पूल आणि आता मुंबई महापालिका मुख्यालयाजवळील पुलाची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर संबंधित पुलाची जबाबदारी रेल्वेने झटकली आहे. रेल्वेकडून वारंवार जबाबदारी झटकली जात असली तरी गेल्या १० ते १२ वर्षात पालिकेने रेल्वेला ११४ कोटी रुपये दिल्याचे समोर आले आहे.
पुलांच्या डागडुजीसाठी महापालिकेने रेल्वेला दिले ११४ कोटी - death
एल्फिस्टन आणि अंधेरी येथील पुलांच्या दुर्घटनेनंतर पुलांचे 'स्ट्रक्चरल ऑडिट' करण्यात आले. सीएसएमटी येथील पूलाचेही ऑडिट करण्यात आले होते. त्यात काही छोट्या दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर करावा म्हणून स्थायी समितीकडे सादर करण्यात आला.
मुंबईत महापालिकेच्या हद्दीत २७४ तर रेल्वेच्या हद्दीत ४५५ पूल आहेत. एल्फिस्टन येथील दुर्घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अंधेरी येथील गोखले पुलाच्या दुर्घटनेत २ जणांचा तर सीएसएमटी येथील पूल दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून ३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. या मृत्यूला निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे उघड झाले आहे. एल्फिस्टन आणि अंधेरी येथील पुलांच्या दुर्घटनेनंतर पुलांचे 'स्ट्रक्चरल ऑडिट' करण्यात आले. सीएसएमटी येथील पूलाचेही ऑडिट करण्यात आले होते. त्यात काही छोट्या दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर करावा म्हणून स्थायी समितीकडे सादर करण्यात आला. हा प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी येणार होता. त्याआधी सीएसएमटी जवळील पादचारी पूल कोसळला आहे.
सीएसएमटी येथील पूल कोसळल्यावर रेल्वेने आपली जबाबदारी झटकली असली तरी पालिकेने मुंबईतील पालिकेच्या पूल विभागाने २०१० पासून २०१८ पर्यंत मध्य रेल्वेला ९४ कोटी ४४ लाख ९१ हजार ८७० रुपये तर पश्चिम रेल्वेला २००८ ते २०१८ या कालावधीत १८ कोटी ५ लाख २४ हजार १७३ रुपये असे एकूण ११४ कोटी ५० लाख १६ हजार ४३ रुपये पुलांच्या दुरूस्तीसाठी दिले आहेत. पालिकेकडून रेल्वेला असे कोट्यवधी रुपये दिले जातात. मात्र, तो निधी खर्च कुठे गेला जातो याचा पाठपुरावा करण्यासाठी कोणताही विभाग नाही. यामुळे या निधीचा वापर करून रेल्वेने आपल्या हद्दीतील किती पुलांची डागडुजी केली हे समोर आलेले नाही.